सन्माननीय विजयदादांच्या पुढच्या पिढीच्या स्थिरीकरणासाठी नामदार अजितदादा व पवारसाहेब यांची बदनामी थांबवा: सुरेश (आबा) पालवे पाटील
सन्माननीय विजयदादांच्या हितचिंतकांनो आपण खरंच किती हुशार आहात? हे लक्षात आले …(आता खर च हा प्रकल्प राजकारणात बुडाला का, आणि पवारांना विशेषतः अजितदादांना हा प्रकल्प बुडवून .. तर काय मिळालं…?)
✒️ सन्माननीय विजयदादांच्या पुढच्या पिढीच्या स्थिरीकरणासाठी नामदार अजितदादा व पवारसाहेब यांची बदनामी थांबवा: सुरेश पालवे पाटील,
१) ह्या प्रकल्पाला मान्यता मिळाली २००४ साली
नावावरूनच लक्षात येईल की यात कृष्णा नदी ही प्रमुख विषय आहे ,पण…. वास्तविकता ही नदी ४ राज्यातून वाहते…. ( महाराष्ट्र ,कर्नाटक ,तेलंगणा आणि आंध्र प्रदेश).
2)भारतीय संविधान कलम २६३ नुसार आणि… आंतरराज्य पाणी तंटा निवारण कायदा १९५६ नुसार कोणत्याही आंतरराज्य नदीतील पाणी वाटपासाठी लवाद स्थापन करावा लागतो….,कृष्णा पाणीतंटा लवाद .. माझ्या माहितीप्रमाणे १९६९ आणि २००४ फक्त दोनदाच लवाद स्थापन झालेत ..
३) कृष्णा नदी याच लवादात येते ..दादासाहेब कृष्णा नदी ही काय ओढा,नाला किंवा क्यानाल फाटा नाही की…जो गरीब गावकरी आणि अधिकाऱ्याला दम दिला की…. पाणी उकडून तिकडे फिरवायला…
४) खूप जबाबदारीने लिहितोय….. दिनाक २८ जून २०१९ च्या महाराष्ट्र टाईम्स मधील बातमी नुसार… भाजपचे सरकार असताना २७ जून रोजी अतुल भातखळकर भाजप आमदार यांनी एक तारांकित प्रश्न विचारला होता की कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचं स्टेटस काय ? .. त्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देताना असे सांगितले की… आपणास हा प्रकल्प करता येणार नाही….कारण पाणीतंटा लवादाने ती परवानगी नाकारली आहे……कारण या प्रकल्पात एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यात ( निरा भीमा ) पाणी आणण्यासाठी लवादाने परवानगी नाकारली आहे…हि वस्तुस्थिती आहे…. एक खरं आहे की, नीरा भीमा जोड कालव्याची काम सुरू आहे कारण की ते एकच उपखोऱ्याचा भाग आहेत,व त्यांसाठीच्या आवश्यक परवानग्या व मंजूरी हि महाराष्ट्र सरकार यांनी पूर्वी घेतलेल्या आहेत,
४) मग या लवादामध्ये अजितदादा व पवारसाहेब यांचा संबंध कुठे व कसा येतो,खरी वास्तविकता समजून न घेता पवार कुटूंबाला बदनाम करण्याचा हा कुटील डाव आहे,…व हा धंदा झाला आहे,
५) वरील पैकी एक ही गोष्ट खोटी आहे का? याची वाचक व अभ्यासक आणि आता आपण सगळे शिकले.. सवरलेली मंडळी आहात …. कोणत्याही भुल थापांना बळी पडून चुकीची पोस्ट व माहिती पसरवू नका येवढीच विनंती.. .आणि अजून एक .. आरटीआय कायद्यानुसार तुम्ही कोणीही सगळी माहिती मिळवू शकता.. .
आता यामध्ये मार्ग काय ..? आणि खरंच हा प्रकल्प व्हावा का..? . तर उत्तर हो आहे… मग कसा होणार… तर त्याला लवाद बसवावा लागेल व त्यातून महाराष्ट्राचं वाटा वाढवून घ्यावा लागेल… ते शक्य आहे की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे, माझ्या मते त्याची शक्यता खूप कमी… धूसर आहे… कारण हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहेव ते महाराष्ट्र सरकार च्या हातात नाही,करायचाच असेल तर विजयदादांनी आपले वजन वापरून केंद्र सरकारकडे हा विषय मांडून..भांडून करुन घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे…
येवढं सर्व केल्यानंतर हे पाणी उजनी धरणात सोडावे लागेल व ते सोडलं की २१ टीएमसी पाणी उर्वरित ५ जिल्ह्यांना द्यावं लागेल…पूर आहे तोपर्यंत काही कराल पण…पूर संपल्यावर काय? उजनीची साठवण क्षमता वाढणार आहे का? उन्हाळ्यात पाणी कोठून आणणार?… बाकीच्या जिल्ह्यांना उन्हाळ्यात पाणी कोठून देणार?… आता विषय कोल्हापूर सांगलीच्या पुराचा…..तो फक्त कर्नाटक सरकारच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे मुळे व आडमुठ्या धोरणामुळे व नदीपात्रातील अतिक्रमणांमुळे होतो हे सत्य आहे ….“मग या विषयात अजितदादा व पवारसाहेब यांना ओढून बदनाम कश्यासाठी करता… दुःख रेडयाला आणि डाग पकालीला असं का? करता?
तुम्हाला नाचता येईना त्यात आंगणाचा काय दोष?
टीप: सदरील लेख हा कोणाचाही अनादर करणेसाठी नाही.. फक्त साप..साप म्हणून भुई धोपटणार्यांसाठी आहे.
सुरेश पालवे पाटील
