“एक भुमीपूत्र आंदोलनाची गोष्ट “
प्रतिनिधी : पुणे
१२ जुलै २००८ मुंबई शंण्मुखानंद हॅाल येथे राजसाहेबांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती त्या बैठकीला पुण्याचे काही पदाधिकारी नगरसेवक त्यांच्या सोबत मी ही मुंबई ला उपस्थित होतो पण पास व्यवस्था असल्यामुळे मला हाॅल च्या बाहेर थांबावे लागले थोड्या वेळाने जी आमंत्रण नसताना बैठकी ला आले होते हाॅल च्याबाहेरील सर्वांना आत सोडण्यात आले मला ही त्या मुळे आत जाण्याची व राजसाहेबांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली
हाॅल च्या आत मध्ये पदाधिकार्यांनी संपूर्ण हाॅल तुडुंब भरला होता अनेक जण आपल्या पक्षाच्या व राजसाहेबांच्या नावाने घोषणा देत होते आम्हा सर्वांना खुर्चां मधील मधल्या वाटेत सर्वांनी बसुन घेण्याचे आदेश व्यासपीठा वरुन दिले आम्ही सर्वजण जमीनीवर मधल्या जागे मध्ये बसलो हाॅलच्या आत मध्ये सर्वजण आदरणीय राजसाहेबांची अतुरतेने वाट बघत होते विविध पक्षाच्या व राजसाहेबांच्या घोषणांनी हाॅल मधील वातावरण खुप जोशमय झाले होते. आदरणीय राजसाहेबांचे आगमन व्यासपीठावर येताच सर्वांनी उभे राहुन साहेबांना हात जोडुन अभिवादन केले
राजसाहेबांनी सर्वांना जागेवर बसण्याचे आदेश दिले हाॅल मध्ये शांतता पसरली. आदरणीय राजसाहेबांनी भाषणाला सुरुवात केली
भाषणा मध्ये साहेबांनी पुणे परप्रांतीय विद्यार्थी यांच्या मुळे आपल्या भुमीपुत्र विद्यार्थी वंचीत राहत आहेत भारती विद्यापीठ, एम.आय.टी व इतर महाविद्यालयाचे परप्रांतीय विद्यार्थी संख्या वाचुन दाखवली व त्या नंतर आदरणीय साहबांनी पुण्याच्या दु. झोपण्यावरुन एखादे हिंसक आंदोलन चालु असेल तर पुणेकर दुपारी दोन वाजले तर ते आंदेलन थांबवुन हातातला दगड खाली ठेवुन झोपायला जातात व ४ वा परत दगड उचलुन आंदोलनाला सुरुवात करतात संपुर्ण हाॅल मधे हसा पसरला. पण मी त्या मुद्याला खुप विचारात गेलो कारण
कारण मला असे मनाला टोचु लागले की साहेबांनी आपल्या पुण्याच्या मनविसे संघटने वर साहेबांनी अविश्वास दाखवला आहे कारण मी स्वत:
मनविसे कोथरुड विभाग अध्यक्ष म्हणून जबाबदारी होती साहेबांनी च्या मनात आलेली संघटने वर आलेली शंका??? मी त्याच क्षणी ठरवले ही आलेली शंका मनविसे पुणे टिम दुर करणार
साहेबांनी त्या शब्द माझ्या मनात आगीची एक ठीणगी पडल्या सारखा होता मी बैठक संपल्या वर मी व पुण्यातील नगरसेवक
यांच्या गाडी तुन पुण्यात परतीला निघालो त्या वेळी आमच्या मध्ये ही साहेबांना आलेली शंका या वरच आम्ही सर्वच विचार करत होतो थोड्या वेळाने साहेबांचा बाबु वागसकर व मनविसे शहर अध्यक्ष ॲड किशोर शिंदे यांच्या मोबाईल वर पुण्याच्या विविध महाविद्यालयाचे परप्रांतीय आकडे sms आला मी त्या वेळी यांना सांगितले की मी उद्या या यादीतील कोथरुड विभागात आंदोलन करतो त्यांनी ही परवानगी दिली मी प्रवासात असतानाच
मी एक sms मनविसे पुण्यातील सर्व पदाधिकारी
मनविसे विभाग अध्यक्ष अॅड.सचिन पवार, रुपेश घोलप, अजय कदम, विक्रांत आमराळे, शैलेश विटकर, संदिप गरुड यांना पाठविला तो असा होता “पुण्यातील मनविसे चे असलेले अस्तित्व आदरणीय राजसाहेबांना दाखवायचे असेल तर उद्या स. १०:३० वा कोथरुड येथे सर्वांनी जमावे – मनविसे पुणे”
असा sms पाठविल्यावर काही सहकार्यांचे फोन आले हो आपण जोरात आंदोलन करु कसे करायचे या वर चर्चा केली जबाबदारी वाटुन घेतली व रात्री उशीरा पुण्यात पोहोचलो.रात्र भर मला साहेबांचे शब्द सारखे मनात घुमत होते सकाळ झाली आई ने घरात निघताना मुलीच्या वाढदिवस १८ जुलै ला पाच दिवस राहीलेत छापुन आणलेल्या पत्रिका वाटायची आठवण केली मी पण थोड्या पत्रिका पिशवीत टाकुन निघालो आंदोलनाचे तयारी करण्यासाठी स.१० वा. पोहोचलो तर मी आश्चर्य चकीत झालो मनविसे पुण्याचे अनेक पदाधिकारी माझ्या अगोदर आपले झेंडे हातात घेऊन ८० ते ९० जण जमले होते तीथे पोहोचले होते मी पण संधी साधुन माझ्या मुलीच्या प्रथम वाढदिवसाच्या पत्रिका वाटल्या व सर्वाना येण्याची विनंती ही केली त्यानंतर आम्ही सर्व MIT महाविद्यालया कडे निघालो आम्ही नकली नोटांचा हार बनवुन सोबत घेतला होता तो हार आम्ही संचालकांना घालणार होतो
आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो..,
आदरणीय राजसाहेबांचा विजय असो अश्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला त्या नंतर आम्ही महाविद्यालयाच्या कार्यलयात पोहोचलो पण त्यांनी आधीच २०/३० पहीलवान सुरक्षारक्षक तिकडे आम्हाला आडवायला लागले तिकडील विद्यार्थ्यांसोबत व्यवहार करणारे सर्व स्टाफ आत जिकडे जागा मिळेल तिकडे लपुन बसला होता आम्ही संचालकांना भेटण्याची मागणी केली पण कोणी आम्हाला ३०-४० मिनटे भेटायला आले नाही तिकडे अनेक डोनेशन भरण्यासाठी आलेले परप्रांतीय विद्यार्थ्यांचे पालक ही पळुन गेले होते
त्यानंतर त्या पैलवानांनी आम्हा काही कार्यकर्त्यांवर ताकत आजमवायचा प्रयत्न केला त्यामुळे आमचा संयम सुटला व फक्त कार्यलयात असलेले देवांचे फोटो सोडुन सर्व फोडुन टाकले संपुर्ण कार्यालय काचेच्या तुकड्यांनी भरले होते आम्ही सर्व घोषणा देत परत निघालो
सर्वांनी गाड्या काढुन बाहेर पडलो पण आपली एक सान्ट्रो महीला पदाधिकार्यांची आत मधे ४-५ आपल्या मनविसे च्या पदाधिकारी सुरक्षा रक्षकांनी धरले असे कळले मग मी व आम्ही ५-६ जण परत वळालो तर २०-२५ पैलवान सुरक्षासक्षक गाडीच्या चारीबाजुने उभे होते पण आम्ही राजसाहेबांचे योध्दे होते आणि महिला पदाधिकार्यांना सोडुन जाणे ही गोष्ट मनाला पटत नव्हती मग आम्ही तिकडेच रस्त्याच्या कडेला पडलेली दगडे घेऊन परत आत मधे आम्ही ५-६ जण घुसलो व त्या सर्वांना पळवुन लावुन ताब्यात असलेली गाडी सोडवुन बाहेर काढली व पुढे पाठवुन दिली आम्ही बाहेर पडणार समोर पुलिसांची गाडी समोर आली आम्ही गाडी समोरासमोर चुकवुन ३ गाड्यांपैकी २ निघालो पण दुर्देव्याने आमची दोन जण पोलिसांच्या ताब्यात सापडली त्यांना पोलिसांनी लाठ्या काठ्यांनी खुप मारले पण आम्ही काही करु शकलो नाही.पण आम्ही मनविसे च्या महिलांना तिकडून बाहेर काढताना आपली दोन जण सापडली .त्यानंतर सर्व मिडीया लाज मनविसे च्या बातम्या ब्रेकींग न्युज चालु झाल्या होत्या मनविसे चा राडा-मनविसेचा धुडगुस -सर्व भारतात बातमी पसरली आम्ही सर्व भुमीगत झालो पोलिसांनी सर्व ठिकाणी नाकाबंदी केली होती.आम्ही आंदोलनात कुणालाही मारहाण केली नव्हती तरी आमच्यावर खोटे गुन्हे टाकण्यात आले कलम I.P.C 307, 354, 143, 147, 341, 452, 427
आम्ही सर्व एका सुरक्षित ठिकाणी होतो आम्हा सर्वांना पोलीस शोधत होती बर्याच जणांच्या घरी ही परीवाराला धमकी देण्यात येत होती आपल्या अनेक वरीष्ठांना पोलीस धमकावत होते कार्यकर्ते जमा करा नाही तर आम्ही तुम्हाला जमा करु त्या मुळे पुण्यातील वरीष्ठपदाधिकारी ही आम्हाला शोधु लागले आमचे ही सर्व लक्ष कोण -कोण सापडलय त्यावर होते नंतर रात्री उशीरा मनविसे शहर अध्यक्षांनी आम्हाला कोथरुड पोलीस स्टेशन मध्ये हजर केले व आम्ही १० जणांना ५ दिवस पोलीस कस्टडी मिळाली व आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले म्हणुन मनसेने मोर्चा ही काढला त्यात हजोरो मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते डोनेशन मुक्त करण्याची व आपल्या भुमिपुत्रांना प्रथम महाविद्यालयात प्रवेश मिळावा त्यासाठी आम्ही आंदोलनाचा नारळ आम्ही १२ जुलै या दिवशी फोडला त्यानंतर पुण्यातले भारती विद्यापीठ,इंदिरा काॅलेज, आयकर भवन असे भूमिपुत्रांवर अन्याय करणारे सर्व ठिकाणी तोडफोड करुन मनसे ने धडाकाच लावला व सर्व महाविद्यालयातील पैश्याचा काळाबाजार थांबला होता संपूर्ण फरासखाना लाॅकअप मनसेमय झाले होते जवळ- जवळ ७०-८० जण आम्ही वेग वेगळ्या केसेस मध्ये आत होतो जे भेटायला येतील त्यांना ही पोलीस जमा करुन घेत होते त्यामुळे संपूर्ण मनसे कार्यकर्त्यां मध्ये भीतीचे वातावरण होते त्यानंतर अनेकांना जामीन झाले महिना भर तडीपार करण्यात येत होते आम्हाला ५ दिवसांनी येरवडा जेल मध्ये हालवण्यात आले आमच्या पैकी सर्वांना पहीलीच वेळ होती जेल मध्ये जाण्याची मनसेची ताकत आपल्या मधे होती त्यामुळे होती त्यामुळे भीती ही नव्हती जेल मधे गेल्यावर आम्हाला आफ्टर मधे ठेवण्यात आले आम्ही तिकडचे सगळे नियम समजुन घेतले त्यानंतर सकाळी अनेक आमच्या परीचयाचे मित्र तिकडे भेटायला आले काही सुचना दिल्या काहींनी ,फरसाण, लोणचे ,कांदा मसाला, बिस्कीट इत्यादी आम्हाला पाठवुन दिले पण आम्ही ते परत केले व सकाळी १० वा जेलरसाहेब येणार होते आम्हाला सर्वांनी पलीकडेच केस कापण्याच्या लाईन मधे बसवले होते पण कैदीच केस कापत होते त्यांची पध्दत बघुन अंगावर काटाच आला कारण ते केस हाताला येतील ती केस धरुन कापत होते पण आम्ही मनसे आंदोलनातले आरोपी जेल मध्ये आणलेत म्हणुन राजसाहेबांना मानणारे अनेक जण आम्हाला भेटायला येत होते व त्या कटिंग करणार्या कैद्यांना ही सुचना देत होते की या सर्वांचे नीट केस कापा म्हणुन त्यांनी ही आम्हाला इतरां पेक्षा वेगळी वागणुक देऊन व्यवस्थित आमची केस कापले.त्यानंतर जेलर साहेब येणार म्हणुन कैद्यांनाच तिकडची व्यवस्था करायला लावत होते व त्यांना झाडु मारायला टेबल खुर्ची उचलायला बाहेरील गवत उपटायला सुचना तिकडील (बाबा) जेल पोलिस देत होते आम्हाला तिकडे ही काही काम सांगण्यात आले नाही संपुर्ण जेल मधील तक्रारी व ज्या कैद्यांच्या हातुन काही चुक घडली अश्या दोन लाईन मध्ये बसवण्यात आले होते जेलर साहेब त्यांचा फौज फाटा घेऊन पोहोचले खरच अजुनही अंग्रेज जाऊन अनेक वर्ष झाली पण त्यांचीच पध्दत अजून तीच आहे. त्यानंतर काही कैद्यांना जेलर च्या आदेशानुसार त्यांना १०-२० अशे चाबकाचे फटके देण्यात येत होते ते बघुन आम्ही सर्व घाबरलो होतो
त्यानंतर ज्यांना काही अडचणी आहेत किंवा काय त्यांना काही घेयचे असेल त्याची मागणी करण्यात येत होती आम्ही सर्वांनी उपोषण करण्याचे ठरवले होते त्या साठी जेलर कडून कागद व पेन ची मागणी केली त्यांनी कारण विचारल्यावर आम्ही त्यांना सांगितले की आम्ही आंदोलन करुन जेल मध्ये आलो आहोत आणि आम्ही सर्व अन्याया विरुध्द उपोषण करणार आहोत जेलर नी आम्हाला लेखी देण्यास सांगितले व तसा अर्ज लिहून दिला पण त्या नंतर आम्हाला सर्वांना वेगवेगळ्या बराकीत ठेवण्यात आले मला टिळक बराक ,c.g,२ नंबर असे आम्हाला जेलरांच्या आदेशानुसार आम्हाला लांब लांब ठेवण्यात आले आम्ही खुप विनंती केली की आम्हा सर्वांना सोबत ठेवा पण त्यांनी ऐकले नाही पण जेल मधे आम्ही उपोषण करतोय ही बातमी सगळी कडे पसरली होती त्यामुळे आम्ही सर्वांची जेल मधे अनेक जण भेटून विचारपूस करायचे आमचा भत्ता २ दिवस आम्ही सर्व फक्त पाणी पीत होतो मला सबजेलर साहेबांनी बोलवुन समजवण्याचा प्रयत्न केला मग आमची जेल मधे रोज मेडीकल ला आणुन आम्हाला Glucon-D देण्यात येत होते. मला माझ्या मुलीच्या १ला वाढदिवसाचा कसे होईल काय होईल हे विचार करुन मी खुप चिंतीत होतो १८ जुलै हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता. वेळच पुढे सरकत नव्हता मी त्या दिवशी मुलीच्या आठवणीने जेल मध्ये खूप रडलो मला वाटले होते की आपण वाढदिवसाच्या आधी जेल मधून बाहेर येऊ पण माझ्या अपेक्षा भंग झाल्याजेल मध्ये रोज सकाळी भेटी-गाठी व जामीन झालेल्यांची नावे पुकारतात मी त्या नावां मधे आमची नावे शोधत होतो आता येईल या नंतर आपलेच असेल पण तसे काही झाले नाही तिस-या दिवशी आमचा जामीन झाला व आम्ही सर्व २१/०७/२००८ या दिवशी दुपारी आम्ही सर्व घरी पोहोचलो.
अॅड.सचिन पवार यांचा सख्या मोठा भावाच्या लग्नाला आम्ही सर्वजण भेटलो.
आम्हाला सोडविण्यासाठी
ॲड.एन.डी.पाटिल ,
ॲड.प्रताप परदेशी
ॲड .जे.शेखर
ॲड.अरुण लंबुगोळ
ॲड अमरसिंह पाटिल
ॲड.विजय ठोंबरे
या आंदोलनात माझ्या सोबत अटक मित्रबंधू-भगिनी
ॲड.सचिन पवार
संदिप गरुड
गणेश शिंदे
अविनाश पालवे
सचिन विप्र
सागर राऊत
सागर खत्री
आशिष तुरे
सौ.उर्मिला गायकवाड
ॲड.सौ.रुपाली ठोंबरे-पाटील
कै.सौ.रजनी अत्रे
मनसे च्या आंदोलनात आम्ही जेल भोगले 👉🏻याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे …!!
सर्व मनसे नेते पदाधिकारी व मनसैनिकांनी आम्हा
सर्वांना सोडविण्यासाठी प्रयत्न केले व आमच्या कुटुंबाला धीर दिला सर्वांचे मनापासून आभार
महाराष्ट्र नवनिर्माण सेने चा….. विजय असो…!!
आदरणीय राजसाहेबांचा… विजय असो..!!
सलग ११ वर्ष न्यायालयीन लढाई लढ्यानंतर निर्दोष मुक्तता झाली.
आज या घटनेला तब्बल १३ वर्ष पूर्ण झाली.
लेखन – प्रशांत कनोजिया
धन्यवाद :- अॅड.सचिन पवार
