अजित पवार एक जबाबदार नेता

अजित पवार एक जबाबदार नेता

२२ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येत असतो,,,

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कारकीर्दीची सुरुवात बारामती मधून सुरू झाली खासदार आमदार ते विविध खात्याचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री असा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास सुरू आहे.

अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा,निर्भिड बाणा, परिस्थितीला धरून वक्तव्य करणारा नेता तसेच हजरजबाबीपणा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन तो प्रश्न तात्काळ सोडवण्याची इच्छाशक्ती असणारा नेता तसेच प्रतिस्पर्धी चाहि तिरस्कार न करणारा नेता विकासाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता अखंड महाराष्ट्र राज्याचा विकास झाला पाहिजे हा ध्यास मनाशी बाळगून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित पवार कार्यरत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी कधीही राजकारण केले नाही महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असताना विरोध कानी मांडलेल्या विकासाच्या मुद्द्यावर तात्काळ कार्यवाही करून आपल्या कामाचा ठसा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उमटवण्याचा काम अजित पवार यांनी के ले आहे.

अजित पवार यांच्या कामाला सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात होत असते बारामती मतदारसंघांमध्ये तेथील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अजित पवार यांच्या बंगल्यासमोर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येतात त्या उभ्या राहिलेल्या रांगेमध्ये जनतेला स्वतः अजित पवार समोरून त्यांची अडचणी जाणून घेण्याचे काम करीत असतात आणि त्या अडचणीवर तात्काळ मार्ग काढण्यासाठी कार्यवाही देखील करताना दिसतात त्यामुळेच त्यांचा हा काम करण्याचा पॅटर्न बारामती मतदारसंघातील लोकांना भावल्याचे जनतेने बोलून दाखवलेले आहे.

अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ज्याच्या विभागाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यानंतर त्या त्या विभागाला नावलौकिक मिळवून देण्याचा प्रयत्न नेहमीच केला असून त्या विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करण्याचा दृष्टिकोन ठेवून व्यापक स्वरूपात काम केले असल्याचे पाहायला मिळते.

अजित पवार यांच्याकडे एखादी व्यक्ती काम घेऊन गेल्यानंतर ते काम होत असेल तर तात्काळ त्याची कार्यवाही केली जाते मात्र ते काम होत नसेल तर त्या व्यक्तीला तात्काळ तुमचं काम माझ्याकडून होत नाही असं थेट बोलून व्यक्तीला स्पष्टपणे सांगण्याचे काम सुद्धा अजित पवार अनेक वेळा करताना दिसतात महाराष्ट्र राज्यामधील इतर नेत्यांच्या स्वभावात आणि अजित पवार यांच्यासोबत जमीन-अस्मानचा फरक असल्याचे या त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसून येतो.

अजित पवार यांचा महाराष्ट्र राज्याच्या सरकारमधील अधिकारी यांच्यावरती प्रशासकीय वचक असल्याच्या बातम्या आपण अनेक ठिकाणी पाहिल्या आहेत प्रशासकीय यंत्रणा अजित पवार यांचे नाव घेतल्यानंतर तात्काळ कामाला लागतात हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे,त्यांनी एखादा विषय हातामध्ये घेतला व त्या विषयाची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यास तो विषय जबाबदारीने पार पाडण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता ती जबाबदारी पार पाडण्याचे सामर्थ्य अजित पवार यांच्यामध्ये असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे त्यांच्याकडे असलेल्या खात्या व्यतिरिक्त आलेल्या कामामध्ये ते कधीही परस्पर हस्तक्षेप करीत नाहीत संबंधित खात्याच्या आलेल्या मागण्या त्या-त्या विभागाकडे पाठवण्यासाठी कार्यालयांना सूचना करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतल्यानंतर व महाराष्ट्र राज्य सरकार चालवण्या च्या प्रक्रियेमध्ये जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी आज पर्यंत कोणतेही बेजबाबदार कामे केलेली दिसून येत नाहीत,त्याच्यामुळे त्यांचा असलेला स्पष्टवक्तेपणा, हजरजबाबीपणा,निर्भिड बाणा विकासाचा दृष्टिकोन,विकासामध्ये राजकारण न करण्याचा दृष्टिकोन त्याच पद्धतीने घेतलेली जबाबदारी पद्धतशीरपणे पार पाडण्याचा त्यांचा असलेला स्वभाव यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्याचा जबाबदार नेता म्हणून ओळखले जाते.त्यामुळे त्यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभावे ही सदिच्छा,,,

किरण साठे
अध्यक्ष – बहुजन ब्रिगेड संघटना
सरचिटणीस -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom