अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटपाचा शुभारंभ
प्रतिनिधी—माळशिरस—महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव येथील सौ शोभा काळू दळवी यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्याचा पहिला मान मिळविला,यावेळी डॉ श्रेणीक शहा,क्लार्क कैलास गावडे,आर.डी.मोरे,प्रहार अपंग संघटनेचे संपर्क प्रमुख शहाजी देशमुख,जिल्हाध्यक्ष पिंटू भोसले,शिवाजी माने,दत्तू निकम,उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे दिव्यांग यांना प्रमाणपत्र देण्याची तात्काळ सोय करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सोलापूर जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ.प्रदीप ढेले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
माळशिरस तालुक्यातील दिव्यांगांना त्यांच्या व्यंगाच्या संदर्भात प्रमाणपत्र काढण्यासाठी त्यांना सोलापूर येथील सिव्हिल सर्जन यांच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत, त्यामुळे सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने माळशिरस तालुक्यातील अनेक अपंग बांधवांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे,त्यामुळे तात्काळ अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात सोय उपलब्ध करण्यात यावी असे किरण साठे यांनी निवेदनात म्हटले होते.
किरण साठे यांनी गेली तीन महिने या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर सिव्हिल सर्जन डॉ प्रदीप ढेले यांनी दखल घेवून अकलूज उपजिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचारी यांना ट्रेंनिग देवून अकलूजमधील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग लोकांना प्रमाणपत्र देण्याची सोय केली आहे.
*दिव्यांग लोकांची आरोग्य तपासणी व प्रमाणपत्रासाठी शीर छत्रपती शिवाजी सार्वजनिक जिल्हा रुग्णांमध्ये डॉ व्ही एम मेडिकल कॉलेजच्या यंत्रणेमार्फत होत असते,या जुन्या व नवीन प्रमाणपत्राची स्मार्ट कार्ड काढून देण्याची यंत्रणा उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे कार्याविंत झाली आहे, दिव्यांग लोकांना तपासणीसाठी सोलापूरला जाण्याची लागणारे टोकन येथे दिले जाईल,व प्रमाणत्रानंतर स्मार्ट कार्ड काढून देण्याचे काम दर शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे मोफत होईल.
डॉ .श्रेणीक शहा
कार्यालयीन अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय अकलूज
माळशिरस तालुक्यातील दिव्यांग लोकांना सोलापूर येथे अनेक हेलपाटे मारावे लागत असल्याचे अनेकांनी सांगितले होते,त्यानुसार सोलापूर जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेले यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा करून अकलूजमधील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगाना नवीन प्रमाणपत्र मिळण्याची सोय करण्यात आली आहे,त्यामुळे माळशिरस तालुक्यातील दिव्यांग लोकांना सोलापूरला जास्त हेलपाटे मारावे लागणार नाहीत,त्यांची प्रमाणपत्र मिळण्याची सोय अकलूजमध्ये झाल्याने अनेकांनी मला आशीर्वाद दिले त्यामुळे मी केलेल्या कामाची पावती मिळाली.
किरण साठे
अध्यक्ष-बहुजन ब्रिगेड संघटना
सरचिटणीस-सोलापूर जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
