गटविकास अधिकारी यांना घेराव घालण्याचा महेश शिंदे यांचा इशारा
प्रतिनिधी : माळशिरस : अकलुज मधील नवीन बाजार तळ येथील मूलभूत प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी माळशिरस तालुक्याचे गट विकास अधिकारी स्मिता पाटील यांना मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी निवेदन दिले आहे.
अकलूज येथील नवीन बाजार तळ येथील मूलभूत प्रश्न साठी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आपण नवीन बाजार तळावरील रस्ते गटारे व लोखंडी पाईप लाईन संबंधीचे प्रश्न सोडवले नाहीत अनेक वेळा आपल्याकडे लेखी तक्रार केली असून आपण त्याची दखल अद्याप पर्यंत घेतलेली दिसून येत नाही त्यामुळे जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आलेली असून याबाबत आपण संवेदनशील व अर्थपूर्ण असल्याचे दिसून आले आहे म्हणून सध्या पावसाच्या वातावरणामुळे रस्ता गटारी या प्रश्नांमुळे जनतेला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे या परिसरात अनेक वेळा अपघात झालेली असून गटारीचे पाणी घराच्या आत येत आहे त्यामुळे दुर्गंधी वाढत आहे व रोगराई पसरत आहे त्यामुळे आपण या तात्काळ दखल न घेतल्यास दिनांक 26 जुलै 2021 रोजी आपल्या कार्यालयाला घेराव घालण्याची आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घ्या असा इशारा मैत्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी गटविकास अधिकारी माळशिरस यांना दिला आहे.
चौकट
माळशिरस तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांना वारंवार संबंधित तक्रारी संदर्भात पत्रकार व्यवहार करून गटविकास अधिकारी नेहमीच दुर्लक्ष करीत असून सत्ताधारी यांच्या ताटाखालचे मांजर असल्यासारखे वागत आहेत,त्यामुळे त्यांना लोकशाही मार्गाने मागणी करूनही जाग येत नसेल तर त्यांना घेराव घालून जाब विचारला जाणार आहे
