माळशिरस तालुक्यातील भांब गावातील लोकांना नम्र आव्हान काळजी घ्या सुरक्षित रहा.- नितीन काळे पाटील.
नातेपुते प्रतिनिधी – देशात व राज्यात कोरोना महामारी ने दिड वर्षापासून थैमान घातले आहे महाराष्ट्र भर दिवसोनदिवस अनेक रूग्ण वाढतच आहेत. माळशिरस तालुक्यात अनेक रूग्ण आढळून येत आहेत. तसेच भांब गावात पाटिलवस्ती येथे 34 रुग्ण आढळून आले असून,भांब गावातील नागरिकांना मी नम्र आव्हान करतो की,
पॉजिटीव्ह पेशंट च्या घरातील लोकांनी न घाबरता आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.व जे नागरिक पाॅजिटिव्ह आले आहेत, त्यांनी न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य तो औषधोपचार घ्यावा. जर कोणाला श्वसनाचा त्रास होत असेल तर मांडकी शासकीय दवाखान्यात उपचार घ्यावा तसेच तिथुन गोळ्या घ्याव्यात. योग्य तो आहार अंडी, मटन, दुध घ्यावे.मास्क व सॅनिटायजर चा वापर करावा. तसेच वारंवार हात साबनाने धुवावे. गर्दी च्या ठिकाणी जाणे टाळावे.
जे अधिकारी वर्ग camp साठी उपस्थित राहत नाही त्यांनी उपस्थित रहावे.
गावातील अतिदक्षता समिती ने लक्ष घालुन योग्य ती कडक पावले उचलावीत व पाटिलवस्ती येथे सॅनिटायजर फवारणी करावी असे या वेळी नितीन काळे यांनी सांगीतले.

