सा.पुणे पॅटर्न गुरसाळे प्रतिनिधी व बहुजन ब्रिगेड संघटनेचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब खंडाळे यांचा कोरोना या रोगाला हरवून आल्याबद्दल त्यांचा सत्कार.
गुरसाळे प्रतिनिधी:कोरोनाने पंढरपूर तालुक्याला अजगरासारखा विळखा घालून बसलाय दररोज संख्या वाढत आहे. त्याचबरोबर लोक त्याचा आता हिंम्मतीने सामनाही करत आहेत. अशा घटना आता समोर येत आहेत. गुरसाळे तालुका पंढरपूर या गावात राहणाऱ्या बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पंढरपूर तालुका युवक अध्यक्ष विशाल वाघमारे यांनी कोरोनामुक्त झालेल्या आपल्या बहुजन ब्रिगेड संघटनेच्या सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब खंडाळे राहणार गुरसाळे यांनी कोरोना ला हरवून आल्याबद्दल त्यांनी त्यांचे हार व शाल घालून सत्कार करून स्वागत केलं .व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी विजय वाघमारे, निलेश वाघमारे,किशोर वाघमारे,नागनाथ खंडाळे, गणेश वाघमारे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
