शिवशंभू संघटनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी राहुल कवडे यांची निवड.
गुरसाळे प्रतिनिधी: शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार व शिवशंभू संघटनेचे कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल डुबल सर यांच्या नेतृत्वाखाली व संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांच्या हस्ते शिवशंभू संघटनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी गुरसाळे तालुका पंढरपूर गावचे श्री राहुल कवडे यांची निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र देताना संस्थापक अध्यक्ष महादेव पवार म्हणाले की,संघटनेचे काम प्रामाणिक पणे करावे व समाजाच्या न्याय हक्कासाठी तत्पर राहावे .
तसेच एकच ” शिव निर्धार अन्यायाविरुद्ध एल्गार “या ब्रीद वाक्याप्रमाने काम करावे .संघटनेचे ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोचवावे
गाव तिथे शाखा घर तिथे मावळा हे अभियान राबवून जनसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवावा .आपली संघटना प्रमुख,संस्थापक व वरिष्ठांना विश्वासात घेऊन संघटनेची प्रतिमा उंचविण्यासाठी व संघटना वाढीसाठी सदैव तत्पर राहावे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष महादेव पवार ,कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल डुबलसर , प्रदेश सचिव सदाशिव जमदाडे.प्रशांत कदम सिव्हील इंजिनिअर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
