अखेर विजयवाडी येथील पाटबंधारे विभागाच्या अतिक्रमण चा विषय किरण साठे यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागणार :- आकाशभैय्या लोखंडे
विजयवाडी येथील नीरा उजवा कालवा फाटा क्रमांक ९ मधील वितरीका पाणीव मायनर ते अकलूज मायनर यावरील अतिक्रमण काढून मिळावे तसेच अतिक्रमण धारकांच्या नावाने संबंधित अधिकारी यांनी कॅनॉल अंतर पूर्व पश्चिम टाकून लेखी पत्र मिळावे या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सकट, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष आकाश लोखंडे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर ५ जुलै रोजी कॅनॉल बुजविण्याचा इशारा देऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता.याच मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे तालुका सरचिटणीस अभय भोसले यांनीही उपविभागीय अधिकारी अकलूज यांना निवेदन दिले होते. उपविभागीय अधिकारी अकलूज कार्यालयासमोर विजयवाडी गावातील ग्रामस्थांनी व राष्ट्रवादी काँग्रेस,जनसेवा संघटना,बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चक्री उपोषण सुरू केले होते.यावेळी बहुजन ब्रिगेडसो.जि.सर.राजाभाऊ सकट ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सा.न्या.वि.कार्यध्यक्ष आकाशभैय्या लोखंडे , सामाजीक कार्यकर्ते चद्रकांत चव्हान , युवा नेते माजी उपसपंच विठ्ठल इंगळे,माजी उसरपंच राहुल जाधव , माजी ग्रा.पं.सरपंच किरन गिरमे , मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,माजी ग्रा.पं.सदस्य दिलीप सकट , किरण नामदास ,तात्यामहाराजा,राजा वाघमोडे , रामा शिंदे , शंकर शिंदे व पदाधीकारी कार्यकर्ते उपस्तीथ होते,सदर आंदोलनाला योद्धा प्रतिष्ठान चे शेखर खिलारे,दलित महासंघाचे राजाभाऊ खिलारे यांनी पाठिंबा दिला.
सदर आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी भेट दिली व उपोषणकर्ते व माळशिरस तालुक्याचे तहसीलदार निंबाळकर यांच्यासमवेत बैठक घडवून आणली,मात्र हा विषय महसूलचा नसून तो विषय पाटबंधारे व भूमी अभिलेख विभागाचा असल्याचे तहसील निंबाळकर यांनी सांगून संबंधित दोन्ही अधिकारी यांना हा विषय सोडवण्यासाठी सांगितले,किरण साठे यांनीही पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बोडके,व उपविभागीय अधिकारी मस्कर यांच्याशी संपर्क साधून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले , त्यामुळे चक्री उपोषणकर्ते यांना उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी अमोल मस्कर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेड च्या पदाधिकारी यांना संबंधित विषय २० ते २५ दिवसात मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले आहे,त्यामुळे किरण साठे यांच्या पाठपुरावा केल्याने १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे बहुजन ब्रिगेडचे जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सकट, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष आकाश लोखंडे व बहुजन ब्रिगेडचे अभय भोसले यांनी सांगितले.


