उपायुक्त यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाची दखल
उपमुख्यकार्यकरी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या चौकशीचे दिले आदेश
प्रतिनिधी : निमगाव : सोलापूर जिल्ह्या परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचला पाटील यांच्यावर शिस्तभंगाची व माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून संपूर्ण कामकाजाची विभागीय चौकशी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते,सदर आंदोलनाला बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे,युवा सेनेचे माळशिरस तालुका समन्वयक विजयकुमार रुपणवर,अविराज माने,गणेश मिसाळ,यांनी पाठिंबा दिला.
आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन उपायुक्त श्री.पाटील यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी(प्रशासन) सौ.उज्वला चिखलीकर यांनी सोलापूर जिल्ह्या परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांना पुढील कार्यवाहीसाठी पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरणी नियमानुसार चौकशी करून योग्य ती कार्यवाही तात्काळ करणेत यावी,चौकशी अंती प्रकरणामध्ये कोणतेही अधिकारी व कर्मचारी दोषी असलेचे आढळून आलेस त्यांचेवर नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करणेत यावी.तसेच केलेल्या कार्यवाही बाबत तक्रारदार यांना अवगत करावे व केलेल्या कार्यवाहीचा पूर्तता अहवाल आस्थापना विभाग पुणे यांना सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी चंचला पाटील व माळशिरस तालुक्याच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्यावर कारवाई होणार असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.
