युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुर मध्ये वृक्षारोपण संपन्न
प्रतिनिधी : पंढरपूर : पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करणे काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने युवासेना प्रमुख मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देशमुख पेट्रोल पंप समोरील गणेश मंदीर येथे वृक्षारोपन करण्यात आले. वृक्षारोपण उपविभागीय पोलिस अधिकारी मा.विक्रमजी कदमसाहेब व शिवसेना सोलापुर जिल्हा प्रमुख मा.संभाजीराजे शिंदे यांच्या शुभहस्ते व शिवसेना ग्राहक सं. कक्ष जिल्हा प्रमुख मा.जयवंत ( आण्णा ) माने,उपजिल्हा प्रमुख मा. सुधीर भाऊ अभंगराव, शिवसेना पंढरपुर शहर प्रमुख मा. रविंद्र मुळे, शिवसेना ग्राहक सं.कक्ष उपजिल्हा प्रमुख मा.सिद्धनाथ कोरे, शिवसेना उपशहर प्रमुख मा.लंकेश बुराडे, मा.विनय वनारे, मा.पोपट नाना सावतराव,शिवसेना पंढरपुर शहर प्रसिद्धी प्रमुख मा.अमित गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाले यावेळी पंढरपुर शहरातील शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन युवासेनेचे आकाश ( मुन्ना ) जयवंत मानेयांनी केले होते.
