बहुजन ब्रिगेड संघटनेच्या दणक्याने करकंब येथील जगताप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा परवाना रद्द

बहुजन ब्रिगेड संघटनेच्या दणक्याने करकंब येथील जगताप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा परवाना रद्द

सोलापूर प्रतिनिधी : बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील जगताप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वर कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन सदर हॉस्पिटलचे आरोग्य विभागाकडून चौकशी होऊन यामध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्या असल्याने सदर प्रकरणी बहुजन ब्रिगेड संघटनेने सातत्याने पाठपुरावा करून अखेर या हॉस्पिटलची डीसीएचसी ची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली असल्याचे राजेश खरे यांनी सांगितले

बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी निवेदनात पुढे म्हटले होते की,सदर हॉस्पिटल मध्ये सेवा देणारे डॉक्टर जगताप हे एम डी आयुर्वेद अशी पदवी धारण केली असताना ते अलोपॅथिकव कोविड १९ चे उपचार करीत आहेत,हे उपचार करीत असताना कोणतेही तज्ञ डॉक्टर,फिजिशियन,डॉक्टर इतर वैद्यकीय कर्मचारी,नसताना अशिक्षित दोन कामगारांच्या मदतीने कोविड १९ रुग्णावर उपचार केल्याने अनेकांचे जीव गेले आहेत असे निवेदनात म्हटले होते.

जगताप रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णाकडून अवाजवी बिल आकारण्यात येत असून,या रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णाकडून घेतलेल्या बिलाची चौकशी करण्यात यावी,आणि रुग्णाच्या मृत्यू ला जबाबदार असलेल्या डॉक्टर वरती मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करून या हॉस्पिटल ची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी सदर हॉस्पिटलचा परवाना रद्द केलेला आहे तसेच सदर प्रकरणी अजूनही पाठपुरावा करून याच्यामध्ये दोषी असणारे डॉक्टर व संचालक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी राजेश खरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom