अकलूजमध्ये विविध उपक्रमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा
अकलूज : प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त अकलूजमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या वतीने करण्यात आले होते.
अकलूज,यशवंतनगर,माळीनगर,संग्रामनगर या गावातील अपंग व्यक्तीना घरपोच जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात पाच किलो गहू पाच किलो तांदूळ वाटप करण्यात आले.तसेच खरोखरच ज्या लोकांना गरज आहे व ज्यांना रेशकार्ड आहे,पण माल मिळत नाही,अशा एकूण १२२ लोकांना वरीलप्रमाणे मालाचे वाटप करण्यात आले.
तसेच अकलूजमध्ये सिताफळ,जांभूळ,वड,चिंच या जातीच्या २२२ रोपांचे वाटप
करण्यात आले,तसेच ६७ गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले.यावेळी बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,समता परिषदेचे पिंटू एकतपुरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख,राजू बागवान,धवल कांबळे,उदय कांबळे,आदित्य काकडे,बंडू कांबळे उपस्थित होते.असे सामाजिक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी राबवून राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा वर्धापन दिन साजरा केला.



