अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय वरिष्ठ अधिकारी सुभद्राकाकुळे यांचा सेवानिवृत्ती निरोप
प्रतिनिधी : अकलूज : अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये वरिष्ठ अधिकारी आ.सुभद्रा काकुळे मॅडम यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करुन निरोप देण्यात आला.त्यांनी तब्बल 36 वर्ष सेवा बजावली असून त्यांचे अतिशय प्रामाणिक अहोरात्र जनतेची सेवा केली. 1985 स*** सुरू झालेला प्रवास 2021 समाप्त झाला.या कार्य काळामध्ये शासकीय कर्मचारी म्हणून काम करत असताना अनेक अडचणीला तोंड द्यावे त्याचप्रमाणे शासकीय काम करत स्वतःच्या परिवाराचा सुद्धा संगोपन करणं गरजेचं असतं आणि या दोन्ही गोष्टी काकुळे मॅडम यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडल्या.गेली ३६ वर्षे सेवा केल्याने स्त्रियांसाठी एक आदर्श मय चेहरा खऱ्या अर्थाने घडल्या आहेत.त्यामुळे त्यांना मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे माळशिरस माजी सरपंच मा. विकास दादा धाइंजे म्हणाले की,जो स्वतःची जीवाची पर्वा न करता न करता दुसऱ्यांसाठी जगत असतो त्यांच्या आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही.काकुळे मॅडम यांनी ३६ वर्षे लोकाची सेवा केली म्हणजे अतिशय कौतुकास्पद असुन येणाऱ्या काळात त्यांच्याहातुन घडलेल्या पिढ्या नक्कीच सार्थकी लागतील.
दरम्यान काकुळे यांना निरोप देताना भावुक झाले होते. आपल्याला आयुष्यात अनेक अडचणी आल्या अनेक हाल सोसत त्यांनी इथपर्यंतचा प्रवास केला.सत्कारामुळे काकुळे मॅडम या भारावुन गेल्या होत्या.व त्यांना गिफ्ट म्हणून #पंढरीचापांडुरंगकोण हे पुस्तक भेट दिले
या कार्यक्रमाचे दरम्यान माळशिरस माजी सरपंच आ.विकास दादा धाइंजे, मैत्री फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे ,राज्य सचिव मारुती सरगर,जिल्हाध्यक्ष नीता ताई सुळे,तालुका अध्यक्ष संजय वाघमोडे,युवानेते सचिन भैया रस्ते,तेजस उबाळे,शंकर ढावरे सह अन्यामित्रपरिवर उपस्थित होते.
