मु ग्रा स योजनेअंतर्गत चालू असलेल्या वटपळी ते विजयवाडी रस्त्याच्या कामाच्या चौकशी साठी १ जानेवारी रोजी पुणे येथे आंदोलन
प्रतिनिधी—पुणे—मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चालू असलेल्या रा,मा १४५ वटपळी ते विजयवाडी रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात येऊन संबंधित अधिकारी व निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मु ग्रा स योजना अधीक्षक अभियंता पुणे यांना बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पिंटू एकतपुरे यांनी निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात माळशिरस तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चालू असलेल्या वटपळी ते विजयवाडी या रस्त्याच्या कामामध्ये फार मोठया प्रमाणावर अनियमितता असून या कामामध्ये निकृष्ठ दर्जाचे मटेरिअल वापरण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याचप्रमाणे या रस्त्याच्या कामाच्या सुरवातीला मुरूम टाकल्यानंतर रोलिंग करणे बंधनकारक असताना त्या नियमाप्रमाणे रोलिंग केलेले दिसत नाही,संबंधित रस्ते हे गावाच्या आडबाजूला व मुख्य रस्त्याच्या आसपास नसल्याने ह्या रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होतेय का नाही,याविषयीची शंका निर्माण झाली आहे,माळशिरस तालुक्यातील सरार्स मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, वटपळी ये विजयवाडी या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा कालावधी हा १३/१२/२०१९ ला संपलेला असून रस्त्याचे काम अजूनपर्यंत अपूर्ण आहे.
चालू असलेले काम ही निकृष्ठ दर्जाचे असल्याने आपण या माळशिरस तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चालू असलेल्या सर्व कामाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे व स्वतःची मनमानी कारभार करून ह्या वटपळी ते विजयवाडी या रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या अमित कन्स्ट्रक्शन,नेवरे ता माळशिरस यांना काळ्या यादीमध्ये टाकून हे निकृष्ठ दर्जाचे काम होत असताना त्यांना मदत करणारे जबाबदार अधिकारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे,या मागणीसाठी अधीक्षक अभियंता मु ग्रा स योजना पुणे यांच्या कार्यालयासमोर दिनांक १जानेवारी २०१९ रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पिंटू एकतपुरे यांनी दिला आहे.