माळशिरस नगरपंचायत वार्ड नंबर १३ येथे कोविड टेस्ट कॅम्प
एकूण १७५ टेस्ट त्यापैकी ४ कोरोना बाधित
माळशिरस (पुणे पटर्न)
माळशिरस नगरपंचायतीच्यावतीने प्रभागांमध्ये कोविड टेस्ट कॅम्प चे आयोजन केले आहे त्यापैकी प्रभाग नंबर १३ मधील श्रीनाथ मस्कोबा मंदिर येथे कोवीड टेस्ट चाचणी चा शुभारंभ माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवासी नायब तहशिलदार तुषार देशमुख, पोलीस निरीक्षक दीपकरत्न गायकवाड, माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे, ॲड.सोमनाथ वाघमोडे,यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुरंदावडे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जरीना शेख, आरोग्य सेविका केतकी साळुंखे, मनीषा शिंगाडे, रूपाली मोहिते, आरोग्य सेवक गोपाळ सोनटक्के, गट प्रवर्तक अनिता साखरे, आरोग्य अधिकारी नानासाहेब गोरे, गटप्रवर्तक अनिता साखरे, आशा सेविका अनिता जमदाडे, सुनिता काळे, मनिषा पवार, छाया पिसे, वैशाली पिसे, सारिका पवार,कैलास इंगळे,धनंजय पालवे,कैलास पवार,प्रकाश राजमाने,संतोष लोंढे,विठ्ठल शेंडे,नामदेव राठोड,अमोल यादव व कर्मचारी उपस्थित होते.
माळशिरस शहरातील काही परिसरामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढलेले असल्याने माळशिरस नगरपंचायतच्या वतीने कोरोना टेस्टिंग सुरू करण्यात आले आहे. कोरोना बाधित रुग्ण इतर लोकांच्या संपर्कात आल्याने संसर्ग वाढत आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून माळशिरस नगरपंचायत यांनी प्रभागांमध्ये टेस्टिंग करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचा आज शुभारंभ मस्कोबा मंदिर येथून करण्यात आलेला आहे. एकूण १७५ लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी ४ कोरोना बाधित रुग्ण सापडले असल्याने या कॅम्प चा फायदा वार्ड नंबर १३ मधील जनतेला झाला आहे.त्यामुळे नगरपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे.प्रभाग नंबर १३ मधील सर्वसामान्य जनतेने कोणत्याही प्रकारचा आजार अंगावर न काढता आमच्या शी संपर्क साधावा त्या सर्वसामान्य जनतेला योग्य उपचार मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे नगरसेविका सौ.नूतन वाघमोडे व ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी सांगितले.
