माऊली धाइंजे व लखन ओव्हाळ यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे– राजेश खरे
प्रतिनिधी–पंढरपूर–बहुजन ब्रिगेडचे सोलापूर सचिव माऊली धाईंजे व नातेपुते शहर अध्यक्ष लखन ओव्हाळ यांची संघटनेमधून जाहीर हकालपट्टी करण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रक बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी दिनांक १७/५/२०२१ रोजी काढून प्रसार माध्यमाना माहिती दिली आहे.
बहुजन ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हा सचिव माऊली धाईंजे व नातेपुते शहर अध्यक्ष लखन ओव्हाळ यांची गेल्या वर्षी निवड करण्यात आली होती,मात्र त्यांनी संघटनेची ध्येय,धोरणे,सर्वसामान्य जनतेला पटवून दिली नाहीत.
संघटनेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कामे केली नसून निवड केल्यापासून आजपर्यंत निष्क्रिय पदाधिकारी असल्याचे वारंवार दाखवून दिल्याने त्यांची संघटनेच्या पदावरून व संघटनेमधून जाहीर हकालपट्टी करण्यात येत आहे आणि माऊली धाईंजे व लखन ओव्हाळ यांचा व संघटनेचा कोणतही संबंध नाही याची नोंद घेण्यात यावी असे राजेश खरे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
