अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा थेट किरण साठे यांना फोन

अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा थेट किरण साठे यांना फोन

आधारकार्ड अपडेट करण्याच्या मागणीची घेतली दखल

माळशिरस : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्यामार्फत निवेदन पाठवून आधार लिंक केलेल्या नवीन कार्डधारकांचा डाटा अपडेट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केली होती,त्या मागणीची अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तात्काळ दखल घेतली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या अन्नपुरवठा विभागाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे व जून महिन्यात मोफत रेशन वाटप करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.मात्र काही कार्डधारकांना आपली नवीन कार्ड काढून आधार कार्ड लिंक करून अनेक महिने व अनेक वर्षे झालीआहेत,मात्र त्यांची कार्ड ऑनलाइन होण्यासाठी लागणारी सर्व कार्यवाही करूनही त्यांची रेशनकार्ड ऑनलाइन झाली नसल्याचे दिसून येत आहे,त्या सर्व कार्डधारकांना मे व जून महिन्याच्या मोफत धान्य वाटप योजनेचा लाभ घेता येत नसून त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत असून आपण तात्काळ आपल्या विभागाकडे ऑनलाइन कार्ड करण्यासाठी आलेल्या सर्व कार्डधारकांचा डाटा अन्नपुरवठा विभागाच्या सर्व्हर वरती अपडेट करून त्यांचे ऑनलाइन कार्ड होण्याची कार्यवाही पूर्ण करावी असे निवेदनात म्हटले होते सदर निवेदन अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना इमेल द्वारे पाठविण्यात आले होते.तसेच किरण साठे यांनी त्यांना मोबाईल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.

महाराष्ट्र राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांनी केलेल्या मागणीची सखोल माहिती घेतली आणि काही नावे व पत्ता मला पाठवा मी माहिती घेतो म्हणजे हा प्रकार काय आहे,हे सर्वच बाहेर पडेल असे बोलून नावे पाठविण्यास सांगितले,किरण साठे यांनी अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नावे व पत्ता पाठविला असल्याचे सांगितले.अन्नपुरवठा मंत्री यांनी याबाबत चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom