पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन कपात करण्यात येवू नये–दत्ता कर्चे

पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन कपात करण्यात येवू नये–दत्ता कर्चे

प्रतिनिधी : माळशिरस: मा.उपविभागीय अधिकारी सो माळशिरस विभाग अकलूज
यांच्या मार्फत उद्धवजी ठाकरे,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना बहुजन ब्रिगेडच्या वतीने निवेदन पाठवुन प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन कपात करण्यात येवू नये अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाच्या च्या विषाणूने मोठ्या प्रमाणात हैदोस घातला असून एक मे ते पंधरा मे पर्यंत लॉकडाउन केलेला असताना सुद्धा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग आढळून येत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कर्मचारी व अधिकारी दिवस रात्र काम करताना दिसतात,त्यांना अधिकचा ताण सोसावा लागत असल्याचे आपण सर्वजण पाहत आहे,त्यामुळे त्यांचे मे महिन्यातील एक ते दोन दिवस वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजले आहे,तो निर्णय तात्काळ माघे घ्याण्यात यावा अशी मागणी बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी दिनांक ११ मे रोजी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे शासकीय व निमशासकीय कार्यालयाला पंधरा टक्के व काही कार्यालयाला पन्नास टक्के उपस्थित राहण्याचे आदेश आहेत त्या सर्व कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांचे पन्नास टक्के वेतन कपात करावे आणि पोलीस,महसूल,आरोग्य विभागातील एकाही कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन कपात करण्यात येवू नये अशी मागणी कर्चे यांनी केली असून सदर निवेदनाच्या प्रति मा.अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा.दिलीप वळसे पाटील गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom