हिम्मत असेल तर मोहिते पाटील कुटुंबातील व १४ पंचायत समिती, ७जिल्हा परिषद सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा घ्यावा मग माझ्या राजीनामा मागावा – अजय सकट
अकलूज (प्रतिनिधी ):सचिन रणदिवे
भारतीय जनता पक्षाचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट हे नेहमीच माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्यावर नैराश्यातून टीका करीत असतात अगोदर त्यांनी भाजपच्या तिकीटावर पंचायत समिती निवडणुकीत निवडून आले आहेत,त्यांनी पंचायत समिती सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते झाले पाहिजे अशी टीका केली होती यावर पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की
माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील कुटुंबातील जयसिंह मोहिते पाटील यांच्या कन्या स्वरूपराणी,धैर्यधील मोहिते पाटील यांच्या पत्नी,अर्जुनसिंह मोहिते पाटील व त्यांच्या पत्नी वैष्णवीदेवी,व इतर १४ पंचायत समितीचे व ७ जिल्हा परिषदेचे सदस्य सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्याचा विसर बाळासाहेब सरगर यांना पडलेला दिसतोय त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्याना राजीनामा द्यायला भाग पाडा आणि मग माझ्या राजीनाम्याची मागणी करा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजयी सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर मग बोला असा बाळासाहेब सरगर यांचा खरपुस समाचार पंचायत समिती सदस्य अजय सकट यांनी घेतला यावेळी बोलताना म्हणाले की,बाळासाहेब सरगर यांना मला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कारण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकित भाजपचे उमेदवारविरोधात निवडणूक लढवली होती त्यांनी मला निष्ठा शिकवू नये ते दोन डगरीवर खेळणारे नेते आहेत पक्षात मोहिते पाटीलाकडे गेले की भाजपच्या दुसऱ्या गटाला शिव्या द्यायचे व दुसऱ्या गटाकडे आले मोहिते पाटील यांना शिव्या द्यायचे त्यामुळे त्यांनी माझ्या राजीनामा मागू नये आणि राहिला प्रश्न मी भाजपच्या तिकिटावर जरी निवडून आलो तरी माझा पक्षच उत्तमराव जानकर आहे त्यामुळे ते सांगितले तो माझा पक्ष आहे असे शेवटी म्हणाले
