प्रकाश पाटील यांच्या टिकेवर शंकर देशमुख यांची प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ
माळशिरस : प्रतिनिधी : सचिन रणदिवे : सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री दत्ता मामा भरणे हे जातीयवादी असून एका विशिष्ठ जातीच्या लोकांना प्राधान्य देत असून ते राजकारण करीत आहेत,तसेच ते सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे.दत्ता मामा भरणे यांना पालकमंत्री पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांच्याकडे केली असल्याचे प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.
भरणे मामा यांच्यावर केलेल्या टिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकर देशमुख यांना प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी दवाखान्यात असल्याचे कारण सांगून नंतर बोलू असे आमच्या प्रतिनिधीला सांगितले,मात्र त्यांनी नंतर फोन उचलला नाही,याचा अर्थ काय समजायचा?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शंकर देशमुख यांचा छुपा पाठिंबा तर नाही ना,किंवा प्रकाश पाटील आणि शंकर देशमुख यांनी ठरवून तर अशी रणनीती आखली नाही ना?अशी चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर देशमुख अनेकवेळा एकत्र वावरतअसल्याचे एकत्र गाडीमध्ये प्रवास करीत असल्याचे माळशिरस तालुक्याने पाहिले आहे,त्यामुळे आपल्या पक्षाच्या पालकमंत्री यांच्यावर टीकेला उत्तर देणे या प्रदेश सरचिटणीस शंकर देशमुख यांना महत्वाचे का वाटत नाही?असा प्रश्न उपस्थित झाला आहे,स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांवर टीका करण्यासाठी देशमुख तर खतपाणी घालत नाहीत ना?हा विषय चर्चेचा झाला आहे,जर असे असेल आणि रोज बरोबर फिरणाऱ्या व अनेकवेळा एकत्र राहणाऱ्या प्रकाश पाटील यांना उत्तर न देता आपल्या पक्षाच्या मंत्र्यांवर टीका करणाऱ्या प्रकाश पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर गोळी झाडणे म्हणजे पक्षाशी गद्दारी करण्याचे काम तर शंकर देशमुख करीत नाहीत ना?अशी चर्चा माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये व जनतेमध्ये होताना दिसत आहे,या प्रकाश पाटील यांच्या टिकेने माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाची भावना दुखावल्या आहेत तसेच प्रकाश पाटील यांच्या टीकेला प्रतिउत्तर न देणाऱ्या शंकर देशमुख यांच्या विरोधात धनगर समाज आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
