लक्षवेधी सेनेच्या आंदोलनामुळेच अकलूजमध्ये मोफत कोविड सेंटर चालू झाले–अनिल साठे

लक्षवेधी सेनेच्या आंदोलनामुळेच अकलूजमध्ये मोफत कोविड सेंटर चालू झाले–अनिल साठे

अकलूज : प्रतिनिधी : अकलूज येथील क्रीडा संकुल च्या पाठीमागे असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये पूर्वी चालू केलेल्या कोविड सेंटरच्या ऐवजी माळशिरस तालुक्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी मोफत कोविड सेंटर उभा करावे या मागणीसाठी लक्षवेधी सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अनिल साठे व राज्य उपाध्यक्ष अमित भिंगारदिवे यांनी 19 एप्रिल रोजी अकलूज येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर बेमुदत थाळी नाद आंदोलन केले होते.यावेळी सन्मित्र संघाचे तालुका अध्यक्ष सुरेश गंभीरे उपस्थित होते. मागणीची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी अकलुज मधील क्रीडा संकुल च्या पाठीमागे असलेल्या कोविड सेंटरमध्ये 300 बेड कोविड सेंटर चालू करून या कोविड सेंटर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

त्याच पद्धतीने या सेंटरमध्ये जास्त सिरीयस नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत,असे लक्षवेधी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल साठे,उपाध्यक्ष अमित भिंगारदिवे,जिल्हाध्यक्ष धवल कांबळे यांनी सांगितले.तसेच लक्षवेधी सेनेच्या आंदोलनामुळेच हे कोविड सेंटर चालू झाल्याने माळशिरस तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना मोफत उपचार देण्याची सोय झाली असल्याचे साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom