प्रतिनिधी: पंढरपूर: पंढरपूर तालुक्यातील एका नेत्याने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या मार्फत स्वतःच्या घरी बोलावल्याची चर्चा
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत स्वतःच्या पक्षाला व स्वतःला कुणीही विचारात घेतले नाही किंवा कुणीही विचारले नाही याची खंत मनामध्ये निर्माण झाल्याने स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलून आपल्या घरी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन येण्याची विनंती केली.संबंधित कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा पंढरपूर शहरात दौरा चालू असताना विनंती केली आणि ज्या पंढरपूर तालुक्यातील एका पक्षाच्या राज्य पातळीवर असलेल्या नेत्याने स्वतः केलेल्या विनंतीला मान दिला,ऐन निवडणुकीत कोणत्याही पक्षाचे नेते कुणालाही भेटत असतात त्यामुळे कालची भेट ही महत्वाची नसून संबंधित पंढरपूर तालुक्यातील एका नेत्याने आपले महत्व वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याना विनंती केल्यानेच ही भेट झाली असल्याची चर्चा पंढरपूर शहरामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये होताना दिसत आहे.
पंढरपूर तालुक्यातील एक नेता ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात उभा केलेल्या उमेदवाराला पंढरपूर मधून किती मते पडली आणि संबंधित नेत्याची पंढरपूर तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात काय वजन आहे किंवा किती किंमत आहे सर्व सोलापूर जिल्ह्यातील जनतेला व पंढरपूर तालुक्यातील जनतेला माहिती आहे,आणि संबंधित नेता हा स्वतःच महत्व वाढविण्यासाठी असे केविलवाणे प्रयत्न करीत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे, त्यामुळे या भेटीचेही हा नेता भांडवल करण्यासाठी माघे पुढे पाहणार नाही अशी दबक्या आवाजात पंढरपूर तालुक्यातील जनतेमध्ये चर्चा पाहायला मिळते आहे.
