माळशिरस ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित गरोदर महिलेची पहिली प्रसूती

माळशिरस ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित गरोदर महिलेची पहिली प्रसूती

किरण साठे यांची शिष्टाई आली कामी

प्रतिनिधी: माळशिरस: माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील दिनांक सात एप्रिल रोजी पहिल्या कोरोना बाधित महिलेची प्रसूती यशस्वी पार पडली,संबंधित प्रसूती नॉर्मल करण्यामध्ये पांढवले सिस्टर,परदेशी सिस्टर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे,त्यांना डाॅ श्रेणिक शहा,डाॅ प्रवीण शिंदे,डाॅ रामचंद्र मेहिते,डाॅ स्मिता शिंदे,डाॅ निखिल मिसाळ,रायबोले मॅडम,शिपाई डोईफोडे व शेख मेजर यांनी सहकार्य केले.

सिव्हिल सर्जन डॉ प्रदीप ढेले सोलापूर यांना राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी कोरोना बाधित गरोदर महिलांसाठी माळशिरस तालुक्यात कोविड सेंटर तात्काळ चालू करावे या मागणीचे निवेदन दिनांक १६ डिसेंबर २०२० रोजी दिले होते.

त्या मागणीची तात्काळ दखल घेऊन सोलापूर जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ प्रदीप ढेले यांनी माळशिरस तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे,त्यामुळे कोविड १९ बाधित गरोदर माता यांची नैसर्गिक प्रसूती व सिझेंरियन यासाठी स्वतंत्र डेडिकेटेड कोविड आब्सट्रेटिकसेंटर म्हणून माळशिरस ग्रामीण रुग्णालयातील १० खाटा राखीव ठेवण्यात याव्यात तसेच इतर कोविड रुग्णासाठी १० खाटा उपलब्ध करून साईड ऑक्सिजन ची व्यवस्था करण्यात यावी,असा आदेश दिनांक २४/१२/२०२० रोजी सिव्हिल सर्जन यांनी वैद्यकीय अधीक्षक माळशिरस ग्रामीण रुग्णालय,यांना दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या पाठपुराव्यामुळे माळशिरस ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित गरोदर महिलांची प्रसूती करण्यासाठी परवानगी मिळाली आणि आणि त्यांची प्रसूती ग्रामीण रुग्णालयात मोफत करण्याची सोय झाली असल्याने खाजगी रुग्णालयात त्यांचा मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च वाचणार आहे,त्यामुळे माळशिरस तालुक्यातील अशा कोरोना बाधित गरोदर महिलांच्या प्रसूती साठी काही अडचण येणार नाही,जरी अडचण आली तर संपर्क साधावा असे आवाहन किरण साठे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom