सोलापूर जिल्ह्यातील लॉक डाऊनला व्यापाऱ्यांचा आणि जनतेचा विरोध–दत्ता कर्चे
सोलापूर :प्रतिनिधी: महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांमध्ये लॉक डाउन करण्याऐवजी कडक निर्बंध लावण्यात येतील अशा प्रकारचे आश्वासन दिलं होतं मात्र त्या आश्वासनाला सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हरताळ फासत असल्याने त्या निर्णयाला बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी प्रखर विरोध केला आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये कडक निर्बंध लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिले होत्या,त्यामध्ये सर्व दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी आठ पर्यंत चालू राहतील आणि रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत सर्व दुकाने सर्व व्यवसाय बंद राहतील,अशा प्रकारच्या आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते मात्र ते पाळण्यात आले नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये जिवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व लहान-मोठे व्यापार्यांचे असलेली दुकाने व सर्व प्रकारचे दुकान बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत,सर्वसामान्य जनतेमध्ये व्यापारी वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे,त्यामुळे हा लाॅकडाऊन त्वरित मागे घेण्याची मागणी बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी केली आहे,आणि नवीन गाईडलाईन जारी करण्यात याव्यात आणि छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची दुकान कडक निर्बंध लावून चालू करण्यात यावी,अशी मागणी व्यापारी वर्गातून व सर्वसामान्य जनतेतून होत आहे,या संपूर्ण लावल्यामुळे लॉक डाउन मुळे सर्वसामान्य जनतेमध्ये आणि व्यापारी वर्गामध्ये महा विकास आघाडी सरकारच्या बाबतीत व जिल्हाधिकारी यांच्या निर्णय मुळे मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे.असून तो निर्णय तात्काळ माघे घेण्यात यावा अन्यथा बहुजन ब्रिगेड संघटनेला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशा कर्चे यांनी दिला आहे.

