अपंग दिलीप नाना काळे यांचा उजवा हात बळजबरीने उकळत्या तेलात घातला म्हणुन राजकीय पक्ष,सामाजिक संघटना उतरल्या मैदानात

अपंग दिलीप नाना काळे यांचा उजवा हात बळजबरीने उकळत्या तेलात घातला म्हणुन राजकीय पक्ष,सामाजिक संघटना उतरल्या मैदानात

अपंग जनता दल सामाजिक संघटना व राजकीय पक्ष इतर सामाजिक संघटना आक्रमक

पुणे पॅटर्न प्रतिनिधी-सचिन रणदिवे

अपंग व्यक्ती दिलीप नाना काळे रा. मोटेवाडी फोंडशिरस तालुका माळशिरस पैसे चोरीचा आळ घेऊन अंधश्रद्धेपोटी तूच माझी पैशाची चोरी केले आहे असे बोलून आरोपी 1)दीपक बाळासाहेब वाघमोडे 2) विमल बाळासाहेब वाघमोडे रा भांबुर्डी तालुका माळशिरस यांनी बळजबरीने अपंग दिलीप नाना काळे यांचा हात धरून उकळत्या तेलात घातला व हात घालून आरोपी तेथून फरार झाले अपंग दिलीप नाना काळे यांना त्यांच्या भावाने व नातलगांना अकलुज मधील अकलाई हॉस्पिटल येथे ऍडमिट केले ज्या दिवशी ऍडमिट केले त्याच दिवशी माळशिरस पोलीस स्टेशन एफ आय आय नोंदवण्यासाठी गेलो असता मी अपंग आहे सांगून सुद्धा अपंग अ‍ॅक्ट 2016 नुसार कलम नंबर 92 बी हे कलम नोंद न करता दुसरी हलकी कलम लावून आरोपींना पाठीशी घालण्याचे काम माळशिरस पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे? अपंग बांधवांचा हात संपूर्ण भाजल्याने त्यांना कोणतेही काम करता येत नाही त्यांचा हात भाजल्याने उदरनिर्वाह करण्याचे अवघड झाले आहे
तरी आरोपींना त्वरित अटक करून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी व अपंगांला उदरनिर्वाह करण्यासाठी नुसकान भरपाई मिळावी अन्यथा सर्व संघटना एकत्रित येऊन उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज यांच्या कार्यालयासमोर दिनांक 19/04/2021 रोजी वार सोमवार बेमुदत आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर निवेदन हे अपंग जनता दल सामाजिक संघटना विजय (काका) कुलकर्णी महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख यांनी दिले आहे
आंदोलनावेळी काही अवचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी माळशिरस पोलीस स्टेशन, प्रांत अधिकारी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण,उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज हे जबाबदार राहतील?
आंदोलनातील मागण्या1) अपंग कायदा 2016 नुसार कलम नंबर 92 बी प्रमाणे एफ आय आर दाखल करून आरोपींना त्वरित अटक करण्यात यावे.2) झालेल्या अपघाताची नुसकान भरपाई अपंग दिलीप नाना काळे यांना मिळण्यात यावी.3) आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अपंग अ‍ॅक्ट 2016 नुसार अपंग कायदा कलम नं 92 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.?4)सदर प्रकरणातील तपास चुकीच्या पद्धतीने झाला आहे तरी पुन्हा तपास करून अपंग बांधवांना न्याय मिळावा?5)सदर प्रकरणातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्यात यावे.असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.?
माहितीसाठी प्रत 1) मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई 32) मा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 3) मा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य 4)मा सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य 5) मा पालकमंत्री सोलापूर जिल्हा 6) मा राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू साहेब 7) मा अपंग कल्याण आयुक्तालय पुणे8) मा जिल्हाधिकारी साहेब सोलापूर 9) मा पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण 10) मा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस उपविभाग माळशिरस अकलूज 11) मा अकलूज पोलीस स्टेशन 12) मा माळशिरस पोलीस स्टेशनसदर आंदोलन हे माळशिरस तालुक्यातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे 1) महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2) लहुजी शक्ती सेना 3) अपंग जनता दल सामाजिक संघटना 4) माहिती सेवा भावी संस्था 5)बहुजन ब्रिगेड 6) भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश 7) क्रांतिकारी संघर्ष सेना 8) भारतीय दलित महासंघ या सर्व राजकीय पक्ष संघटना यांच्या वतीने वार सोमवार दिनांक 19/04/2021 रोजी सकाळी 11 वाजता बेमुदत थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom