मागण्यापूर्णनकेल्यास_15एप्रिल_रोजीजनसेवासंघटनाकरणारबोंबाबोंबआंदोलन…..

मागण्यापूर्णनकेल्यास_15एप्रिल_रोजीजनसेवासंघटनाकरणारबोंबाबोंबआंदोलन…..

नवीन बाजारतळ अकलुज या ठीकानी बऱ्याच दिवसांपासून मूलभूत गरजा पुरवण्यात अकलूज ग्रामपंचायत कमी पडत आहे.वारंवार या संदर्भात निवेदना व्दारे मागण्या करून ही कार्यवाही केली जात नाही.तसेच नवीन बाजारतळ सोडला तर बाकीच्या सर्व भागांमध्ये काम चालू आहे. मग या गोष्टी जाणीवपूर्वक होतात का याचीही चौकशी झाली पाहिजे व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.व आमच्या मागण्यांचा जाणीवपूर्वक विचार केला जात नसेल तर आम्ही आता शांत बसणार नाही जनतेच्या सामान्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आक्रमक भूमिका घेऊन 15 एप्रिल रोजी तीव्र स्वरूपाची आंदोलने छेडणार आहोत.आशा आशयाचे निवेदन जनसेवा संघटनेचे महेश शिंदे यांनी अकलूज ग्रामपंचायत चे ग्रामसेवक मुंगूसकर यांना दिले.

नवीन बाजार तळावरील दुसऱ्या टप्प्यातला डांबरी रोड झाला पाहिजे
लाईन नंबर 1 व 2 गटार दुरुस्ती झाली पाहिजे
शंभर फुटी गिरजणी चौक दलित वस्ती मध्ये लाईट पोल बसवून मिळाला पाहिजे
पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जुनी असल्याने तिथे लोखंडी पाईप लाईन झाली पाहिजे
अतिक्रमणे नियमानुकूल करून जागा वाटप करण्यात यावे !
अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून संबंधित प्रश्नावर लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास ग्रामपंचायतच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.तसेच माहितीसाठी प्रत गटविकास अधिकारी,(माळशिरस विभाग),उपविभागीय अधिकारी (माळशिरस विभाग),सोलापूर जिल्हा दंडात्मक अधिकारी देण्यात आले. यावेळी निवेदन देण्यासाठी महेश शिंदे, अविनाश सोनवणे, भिवाजी भोसले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom