बांधकाम कामगार नोंदणी करण नूतनीकरणाच्या मोहिमेस पिलीव येथे शिबिराने सुरुवात 

बांधकाम कामगार नोंदणी करण नूतनीकरणाच्या मोहिमेस पिलीव येथे शिबिराने सुरुवात

पिलीव :पुणे पॅटर्न वृत्तसेवा :माळशिरस तालुक्यातील बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या नोंदणी नूतनीकरणास पिलीव येथे लोकमंगल सेतू केंद्रात अल्पदरात नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी शिवराज पूकळे युवाशक्ती संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माळशिरस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विकास धांईजे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .यावेळी विकास धांईजे दामोदर लोखंडे, शिवराज पूकळे डॉ. कुमार लोंढे ,मारुती सरगर यासीन पठाण, लक्ष्मण करे,यांच्या हस्ते प्राथमिक प्रातिनिधीक.स्वरूपाची नोंदणी करण्यात आली .यावेळी आपल्या प्रास्ताविकात कामगारांच्या व त्यांच्या पाल्यांना शासनाने जाहीर केलेल्या 22 योजनांची माहिती अभियंता यासीन पठाण यांनी आपल्या प्रस्तावीकात सविस्तरपणे दिली या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा तर यावेळी मार्गदर्शन करताना विकास धांईजे यांनी कामगार नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी यापूर्वी पाच वर्षाचा होता तो आता रद्द करून दरवर्षी नूतनीकरण करावे असा नियम शासनाने पारित केल्याने व सर्वसामान्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन नोंदणीचे नूतनीकरण करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही कारण दिवसभराचा घोटाळा जाण्यायेण्याचा खर्च व तालुक्याच्या ठिकाणी सेतू केंद्रातून आकारली जाणारी जास्तीची फी त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारे नाही .म्हणून पिलीव येथे लोकमंगल सेतु सेवा केंद्राच्या वतीने या शिबिरा उद्घाटना पासून अल्पदरात नोंदणी करून दिली जाणार असून कामगारानी, शासनाने घोषित केलेल्या बावीस योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करताना त्यातील मुलीचे लग्न शिक्षण मुलांचे शिक्षण अपघाती विमा व द्भवणार्‍या प्रसंगांना भरीव निधीची तरतूद या योजनेत केली असून कार्यकर्त्यांनी या योजनांचा पाठपुरावा करून संबंधित कामगारांना व त्याच्या पाल्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती आपल्या भाषणातून विकास धांईजे यांनी केली यावेळी शिवराज पूकळे यांनी सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या व हिताच्या गोष्टी समस्या सोडविण्यासाठी नेहमीच ही संघटना, जातपात पक्ष न पाहाता कार्य करीत आहेत तर आशा कार्यात अग्रेसर राहून सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना कार्यरत असते म्हणून या योजनेचा सर्वांनी ।लाभ घेण्याची विनंती केली यावेळी विकास धांईजे ,डॉ. कुमार लोंढे ,दामोदर लोखंडे, शिवराज पूकळे,यासीन पठाण ,यांनी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सूत्रसंचालन विक्रमी सुळे तर आभार प्रदर्शन रणजित सातपुते यांनी व्यक्त केले.यावेळी सेतू चालक लक्ष्मण करे खंडू माने सतीश. होनमाने,
विक्रम सूळ गणेश देशमुख सुजित सातपुते रणजित सातपुते, आबा बनसोडे अण्णा भोसले सूरज वाघमारे,संजय करडे,आदी मान्यवर उपस्थित होते .
फोटो. कामगारांना नोदणी केल्याची पावती देताना, विकास धांईजे, शिवराज पूकळे, डॉ. कुमार लोंढे, दामोदर लोखंडे, सुजित सातपुते, खंडू माने व इतर मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom