रोडवेज सो.प्रा.लि पुणे यांना ५४,६०,५५० रुपयांचा दंड किरण साठे यांच्या पाठपुराव्याला यश

रोडवेज सो.प्रा.लि पुणे यांना ५४,६०,५५० रुपयांचा दंड

किरण साठे यांच्या पाठपुराव्याला यश

पिलीव वार्ताहर–आज २४ तास
–माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे असलेल्या रोडवेज सोल्युशन प्रा.लिमिटेड कंपनी पुणे या कंपनीला राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येणाऱ्या पंढरपूर (वाखरी) ते म्हसवड या महामार्गाच्या कामाचा ठेका मिळाला आसून त्या रस्त्याचे काम ही मंदगतीने चालू आहे
,आणि या महामार्गाच्या कामामध्ये वापरली जाणारी वाळू व इतर मटेरिअल निकृष्ट दर्जाचेवापरले जात असल्याची तक्रार किरण साठे यांनी सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे केली होती,मात्र तेथील संबंधित अधिकारी यांनी त्या तक्रारी कडे दुर्लक्ष केले होते,त्यानंतर किरण साठे यांनी संबंधित कंपनीचा प्लांट अस्तित्वात असलेल्या गावामधील (तांदुळवाडी ता माळशिरस) तलाठी यांच्याकडे तक्रार करून या कंपनीमध्ये बेकायदेशीर रित्या उपसा केलेली व निकृष्ट दर्जाची म्हणजे ओढ्यातीलवाळू वापरली जात असल्याची तक्रार केली,आणि तेथे कर्तव्यास असलेले तलाठी यांनी तक्रारदार किरण साठे यांच्या समक्ष त्या कंपनीच्या आतमध्येसाठा केलेल्या 150 ब्रास वाळूचा पंचनामा केला,आणि तो पंचनामा पुढील कार्यवाही साठी तहसील कार्यालय माळशिरस येथेरितसर जमा केला.

त्याचप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यासाठी तहसील कार्यालय माळशिरस यांच्याकडून वारंवारसंबंधित ठेकेदाराला नोटिसा पाठवूनही त्या रोडवेज सोल्यूशन प्रा. लिमिटेड कंपनी पुणे यांनी त्या स्वीकारल्या नाहीत व दखल घेतली नाही म्हणूनत्या वाळू साठ्या संदर्भात पुरावे दिले नाहीत,आणि म्हणून माळशिरस तहसील कार्यालय यांनी दिनांक १७/१२/२०१९ रोजी त्या कंपनीला ५४,६०,५५०रुपये एवढा दंड आकारण्याचा आदेश करून कारवाई केल्याचे अधिकार्यानी सांगितले माझ्या प्रयत्नाला व पाठपुराव्याला यश मिळाल्याचे किरण साठे यांनी सांगितले.

चौकट-
रोडवेज सोल्यूशन प्रा.लिमिटेड पुणे या कंपनीने या लातूर ते सातारा या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येणाऱ्या माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील प्लांट च्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामध्ये निकृष्ट मटेरिअल वापरण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे,आणि या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठी व त्यांना सामील असणाऱ्या अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे यासाठी माझे पुढचे आंदोलन असणार आहे,आणि जोपर्यंत या कंपनीकडून दंड वसूल केला जात नाही तोपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे.

किरण साठे
सरचिटणीस-सोलापूर जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom