भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी श्री सतीश अडगळे यांची निवड
आज २४तास – प्रतिनिधी—माळशिरस–:भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री भाऊसाहेब कांबळे यांच्या हस्ते मा.श्री सतीश आडगळे पत्रकार यांची महाराष्ट्र राज्य संघटक पदी निवड करण्यात आली
यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कैलास सातपुते सर,प्रदेश सरचिटणीस अंबादास शिंदे,महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष अॅड माधुरीताई जोशी, राज्य सचिव दत्ताभाऊ कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल चिकणे, राज्य युवा अध्यक्ष भाऊसाहेब घोडके,जालना जिल्हाध्यक्ष देवीलाल बीरसोने, राज्य उपसचिव सैदु शिंदे, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष प्रा.शिवाजी चंदनशिवे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम पोवार, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुधाकर गावकर,नाशिक जिल्हा युवकअध्यक्ष समाधान सूर्यवंशी,सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे, माढा तालुका कार्याध्यक्ष अमोल कुटे, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.