अकलूज पाणीपुरवठा योजना त्वरित पूर्ण करण्याची मनसेची मागणी
प्रतिनिधी—अकलूज—महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सहकार सेना अध्यक्ष शडो सहकार मंत्री व राज्याचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजमधील सर्वसामान्य माणसाला उच्च दाबाने पाणी मिळाले पाहिजे यासाठी साडे तेरा कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन कित्येक वर्षे झाली मात्र अकलूजमधील पाणी पुरवठा योजना अनेक वर्षे झाली पूर्ण होण्याचे नाव घेताना दिसत नसल्याचे दिसून येत आहे,उर्वरित ठिकाणी केलेले काम पूर्ण झाले असून महर्षी कॉलनी,इंदिरा नगर, येथे चालू असेलेले काम उत्तमरीत्या चालू असून ते तात्काळ पूर्ण करावे आशा मागणीचे निवेदन पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाला मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे यांनी दिले आहे.
सदर योजना आजपर्यंत अपूर्ण स्थितीत असून मागास असलेल्या भागामध्ये व खरोखरच ज्या भागामध्ये ही योजना राबविणे गरजेचे असताना तिथे राबविण्यात आली नाही,आणि काही ठिकाणी तर बरेच दिवस योजनेचे फक्त पाईप आणून टाकले आहेत मात्र पाणी येण्यासाठी लागणारी यंत्रणा तयार केली नाही त्यामुळे सदर योजना ही येत्या दहा दिवसांत पूर्ण करून त्या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पाणी उपलब्ध करुन न दिल्यास मनसेच्या वतीने अकलूज ग्रामपंचायत च्या विरोधात व पाणीपुरवठा विभाग पंचायत समितीच्या विरोधात अकलूजमधील साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर दिनांक 3 मार्च रोजी 2021 रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशा रा सुदाम आवारे यांनी दिला आहे.
