सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी २५ फेब्रुवारीला आंदोलन

सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी २५ फेब्रुवारीला आंदोलन

प्रतिनिधी—फुरसुंगी—मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे
यांना बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी निवेदन देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज येथे कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी व शिंगणापूर रस्त्याच्या ठेकेदाराला पाठिशी घालणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज या कार्यालयासमोर शिंगणापूर ते शिंगणापूर पाटी या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले,त्या अनुषंगाने संबंधित अधिकारी यांनी ठेकेदाराला पाठिशी घालण्याच्या उद्देशाने त्याचे उत्तर दिले,त्यामुळे आम्ही त्या कामावर जाऊन पाहणी केली,त्याठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून आले,तरीही आपल्या विभागाचे अधिकारी संबंधित ठेकेदार यांना पाठिशी घालण्याच्या उद्देशाने कार्यवाही करीत असल्याने आम्ही अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर यांना निवेदन देऊन संबंधित कामाची चौकशी करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला होता,त्यानी त्याची त्वरित दखल घेऊन संबंधित रस्त्याची चौकशी करण्यात येऊन अर्जदार यांना तातडीने कळविण्यात यावे असा आदेश असताना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आम्हाला कोणत्याच प्रकारची माहिती दिली नाही असे निवेदनात म्हटले आहे.

याचाच अर्थ असा की कार्यकारी अभियंता हे ठेकेदाराला पाठिशी घालत आहेत,आणि वरून अकलूजचे कार्यकारी अभियंता हे अर्जदार यांचे फोन उचलत नाहीत आणि त्यांचे नंबर ब्लॅक लिस्ट टाकतात तरी त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर त्वरित शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी आणि त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये हजर झाल्यापासून सर्व प्रकारच्या कामामध्ये लक्ष न दिल्याने त्यांच्या कार्यकाळात झालेली सर्व कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत त्यांची ही चौकशी करण्यात यावी आणि शिंगणापूर ते शिंगणापूर पाटी या रस्त्याच्या कामाची निःपक्षपातीपणे चौकशी करून संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुख्य अभियंता पुणे यांच्या कार्यालयासमोर दिनांक 25/02/2021रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom