घोटी गावातील अवैद्य धंदे त्वरित बंद करावे—राजेश खरे
प्रतिनिधी—सोलापूर–घोटी तालुका माढा येथील अवैद्य धंदे त्वरित बंद करावे या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे जिल्हाउपध्यक्ष राजेश खरे यांनी पोलीस अधीक्षक सोलापूर व राज्य उत्पादन शुल्क विभाग चे अधीक्षक याना निवेदन दिले आहे.
यावेळी बहुजन ब्रिगेडचे जिल्हाउपाध्यक्ष राजेश खरे,माढा तालुकाउपाध्यक्ष पप्पू गायकवाड,सिद्धेश्वर वाघमारे,गोरख माली,गोविंद लोंढे,राहुल वायदंडे, व घोटी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
घोटी गावातील ग्रामस्थांनी बहुजन ब्रिगेडचे जिल्हाउपध्यक्ष राजेश खरे यांच्याकडे लेखी तक्रार करून घोटी गावातील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी बहुजन ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करून हे चालू असलेले अवैद्य धंदे कायमचे बंद करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली होती, त्या मागणीला अनूरून आज बहुजन ब्रिगेडच्या वतीने घोटी गावातील धंदे बंद करून संबंधित अवैद्य धंदे चालकानवरती व त्यांना अभय देणाऱ्या गावतील सरपंच,पोलीस पाटील,टेभुर्णी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक, व घोटी गावचे बिट हवालदार यांच्यवरती त्वरित निलंबनाची कारवाई करून हे अवैद्य धंदे कायमचे बंद करावे अन्यथा २० डिसेंबर रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे जिल्हाउपध्यक्ष राजेश खरे यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.