संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा पराभव कुटुंबातील व्यक्तीनेच घडवून आणल्याची चर्चा

संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा पराभव कुटुंबातील व्यक्तीनेच घडवून आणल्याची चर्चा

प्रतिनिधी–अकलूज–संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अकलूज ग्रामपंचायतच्या निवडणुकीत संग्रामसिंह मोहिते पाटील यांना पराभव पत्करावा लागला असून या पराभवाला कोण जबाबदार आहे?याची चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात होताना दिसत आहे.

आशिया खंडातील नंबर एकची असलेल्या ग्रामपंचायत मध्ये पहिल्यांदाच मोहिते पाटील यांच्या म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बरोबर असलेल्या मोहिते पाटील कुटुंबातील जयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र व अकलूज ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच संग्रामसिंह मोहिते पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.या पराभवामध्ये त्यांच्या जवळच्या नातेवाईक यांनी त्यांचा पराभव घडवून आणल्याची चर्चा संपूर्ण अकलूजसह,माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात चालू असुन माळशिरस तालुक्यातील किंगमेकर समजल्या जाणाऱ्या जयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाला पराभव पत्करावा लागणे हे त्यांच्या जिव्हारी लागले आहे,आपल्याच कुटुंबातील एका व्यक्तीने त्यांना आतून पाडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जयसिंह मोहिते पाटील यांच्या साखर कारखान्यातील कामगार तसेच शिक्षण संस्थेचे कामगार हे सर्वात जास्त प्रमाणात अकलूजमधील असून सुद्धा ह्या कामगारांनी संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा प्रचार केला नाही का?असाही प्रश्न उपस्थित होत आहे,कामाला जयसिंह मोहिते पाटील यांच्या शिक्षण संस्थेमध्ये व साखर कारखान्यात असताना जयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाचा म्हणजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा या निवडणुकीत त्याच्या कामगारांनी काम केले नसल्याचे दिसून आले आहे,किंवा जयसिंह मोहिते पाटील यांचे स्वतःच्या संस्थेमध्ये व कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांवरील ताबा सुटल्याचे व कामगार त्यांचे ऐकत नसल्याचे दिसून आले आहे.

जयसिंह मोहिते पाटील हे माळशिरस तालुक्याचे राजकीय गणित मांडतात व ते थोड्याफार फरकाने निश्चित होते मात्र आपल्या मुलाच्या बाबतीत त्यांचे गणित कसे काय चुकले हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे,त्याचप्रमाणे निवडणुकीच्या माध्यमातून कोणी तरी जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर राजकीय वार तर केला नाही ना अशीही चर्चा माळशिरस तालुक्यात होताना दिसत आहे,संग्रामसिंह मोहिते पाटील निवडून आल्यानंतर त्यांना सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधरण वर्गासाठी झाले असते तर त्यांना सरपंच करावे लागले असते किंवा उपसरपंच पद सर्वसाधारण झाले असते तर त्यांना उपसरपंच पद देणे भाग पडले असते म्हणून तर संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा स्वयकीयांनी गेम केला नाही ना असा समज जनतेमध्ये पसरल्याचे पहावयास मिळत आहे,संग्रामसिंह मोहिते पाटील निवडून आल्यानंतर अकलूज वर पुन्हा जयसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व प्रस्थापित होईल आणि आपले वर्चस्व संपेल या भीतीपोटी तर संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा राजकीय गेम तर घडवून आणला नसावा ना ह्या चर्चने जोर धरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom