वार्ड नंबर 1 मध्ये कारखान्यात भ्रष्टाचार व घोटाळा करणाऱ्या खबऱ्या उमेदवाराच्या चर्चेने जोर धरला आहे.
प्रतिनिधी–अकलूज–अकलूज ग्रामपंचायत च्या वार्ड नंबर एकमध्ये अनुसूचित जाती च्या प्रवर्गातील एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले नशीब आजमावत आहेत,मात्र या निवडणुकीत चर्चा मात्र खबऱ्या उमेदवाराची असून त्याच खबऱ्याने कारखान्यात मोठ्या प्रमाणावर घोटाळा केल्याचीही चर्चा सर्वसामान्य जनतेमधून पाहायला मिळते आहे,तसेच कारखान्यात कोणत्या प्रकारचा घोटाळा केलाय आणि किती रुपयांना कारखान्याला या संबंधित खबऱ्या उमेदवाराने टोपी घातली आहे,त्या कारखाण्याच्या चेअरमन ने या खबऱ्या उमेदवाराला कामावरून काढून टाकले आहे,संबंधित पॅनल प्रमुखाने आपल्या मर्जीतील खबऱ्या म्हणून एका उमेदवाराला निवडणुकीत उभा केले आहे,ज्या चेअरमनने या खबऱ्या व घोटाळा केलेल्या उमेदवाराला कामावरून काढून टाकले आहे त्या चेअरमनची एक पद्धत आहे त्यांच्या कोणत्याही संस्थेत एकदा भ्रष्टाचार व घोटाळा करणारा माणूस संबंधित चेअरमन ने कधीही आपल्या संस्थेत पुन्हा कामावर घेतला नसल्याचा इतिहास त्यांच्या नावावर नोंद आहे.
त्यामुळे सदर घोटाळा व भ्रष्टाचार करणाऱ्या उमेदवाराला निवडून दिल्यानंतर आपल्या विभागचा विकास होणार नाही तर संबंधित खरबऱ्या उमेदवार चढ्या लावण्याशिवाय व ग्रामपंचायत मध्ये घोटाळा व भ्रष्टाचार करण्यात पटाईत आहे आणि तो त्याच गोष्टीला प्राधान्य देईल अशी सर्वसामान्य मतदारामध्ये चर्चा पहावयास मिळते आहे.
