भंडारा प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा- दत्ता कर्चे
प्रतिनिधी–फुरसुंगी—भंडारा येथील शासकीय रुग्णालयात घडलेल्या आगीमुळे दहा बालकांचा मृत्यू झाला आहे त्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार असणाऱ्या अधिकारी यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा,तसेच संबंधित या आगीच्या प्रकरणामुळे ज्या बालकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या नातेवाईक यांना तात्काळ शासकीय मदत करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि चौकशी मध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
