श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस येथे बालिका व महिला शिक्षण दिन साजरा
प्रतिनिधी सचिन रणदिवे
श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस या आपल्या विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती हा बालिका व महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरूवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य योगेश गुजरे यांच्या हस्ते करण्यात आले.सावित्रीच्या लेकी विद्यालयातील मुली वेगवेगळे पोशाख परिधान करुन आल्या होत्या.यावेळी मुलींच्या रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.तद्नंतर प्राचार्य योगेश गुजरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पहिली महिला शिक्षिका म्हणून ज्यांना मान मिळाला त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे.आज घरोघरी सावित्रीच्या लेकी घडल्या पाहिजेत.
याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
