बहुजन ब्रिगेडच्या भूम तालुकाध्यक्षपदी क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी केतन भोसले यांची निवड
नातेपुते–प्रतिनिधी —
बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या सूचनेनुसार बहुजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेश खरे यांची तात्पुरती उस्मानाबाद जिल्ह्यप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,राजेश खरे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भूम तालुका अध्यक्षपदी आदित्य क्षिरसागर तर उपाध्यक्षपदी केतन भोसले,तर भूम शहाराध्यक्षपदी आदित्य लांडगे,चिंचपूर शहाराध्यक्षपदी संतोष कसबे यांची निवड केली आहे,सदर निवडीचे पत्र उस्मानाबाद जिल्ह्याप्रभारी राजेश खरे यांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी सिद्धेश्वर वाघमारे,अक्षय लोंढे,महेश गायकवाड,रोहित गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
बहुजन समाजामध्ये एकोपा निर्माण करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटनेची ध्येय धोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्न करून समाजातील महिला,विद्यार्थी,
सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी यांच्या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून त्याला प्रसिद्धी द्यावी असे नियुक्ती पत्रामध्ये नमूद केले आहे.
