अकलूजमधील उदय कांबळे यांचा युवा सेनेत जाहीर प्रवेश
प्रतिनिधी–अकलूज–माळशिरस तालुक्यामध्ये युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य रुपेश कदम व युवा सेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली अकलूजमध्ये युवा सेनेची आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे,शिवसेना माळशिरस तालुका अध्यक्ष नामदेव वाघमारे,युवा सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे,महादेव बंडगर,दत्ता गोरे उपस्थित होते.
सदर आढावा बैठकीच्या कार्यक्रमामध्ये महर्षी कॉलनी,जुना पंढरपूर रोड येथील उदय कांबळे यांनी युवा सेनेमध्ये जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य युवा सेना कोअर कमिटी सदस्य रुपेश कदम व राज्य विस्तारक विपुल पिंगळे,यांच्या हस्ते धनुष्य बान व भगवा झेंडा हातात घेऊन त्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
उदय कांबळे यांनी प्रवेश केल्यानंतर सांगितले की युवा सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अकलूजमध्ये मोठ्या प्रमाणावर युवा सेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून महाविकास आघाडी सरकारच्या विविध प्रकारच्या योजनेची माहिती तसेच शिवसेनेचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
