मनविसे च्या वतीने पंढरी गौरव पुरस्काराचे वितरण
(मनसे महाराष्ट्र सैनिक सागर बडवे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी)
पंढरपूर शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा मनसे गौरव,,
पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पंढरपूर शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पंधरा रत्नाचा सन्मान चिन्ह देऊन पंढरी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले,यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेले डाॅ.संगीता पाटील,नगरसेवक कृष्णा वाघमारे,नगरसेवक विक्रम शिरसट,संदीप माने,लखन माने,शिवभक्त प्रतिष्ठान,राॅबीन विजय बडवे हूड आर्मी,श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ, झाकीर नदाफ पत्रकार,ओंकार जोशी, सफाई कामगार नगरपालिका, उपजिल्हा रुग्णालय नर्ससेस,दामिनी पथक,विक्रम टिंगरे
यांना मनसेच्या वतीने सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलिप बापू धोत्रे,पंढरपूर नगराध्यक्ष साधना ताई भोसले, मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,पंढरपूर नगरपरिषद चे उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,मनविसे पंढरपूर शहर संघटक शैलेश धट, शहराध्यक्ष प्रताप भोसले, शहराध्यक्ष पुजा माळी, उपाध्यक्ष अवधुत गडकरी, उपाध्यक्ष रोहन पंढरपुरकर, कार्यक्रमाचे संयोजक व मनसे महाराष्ट्र सैनिक सागर बडवे यांच्या हस्ते गौरविण्यात आले,
यावेळी बोलताना सागर बडवे म्हणाले की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारानुसार समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणारांचे कौतुक झाले पाहिजे ,गौरव झाले पाहीजे कारण ही लोक आपलं आयुष्य समाजासाठी खर्च करत असतात कुठलाही स्वार्थ न ठेवता समाजासाठी अहोरात्र झटत असतात, समाजासाठी योगदान देत असतात आशा लोकांचं सन्मान करण आपलं कर्तव्य आहे,
पंढरपूर च्या आशा लोकांची गरज आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते,, या पंधरा रत्नाचा इतर लोकांनी आदर्श घेतला पाहिजे,, आणि पंढरपूर च्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे,,
पंढरपूर मंगळवेढा अजूनही मागास आहे ,म्हणावा तसा विकास झाला नाही, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, तरुण वर्ग व्यसनाधीन होत चालला आहे हाताला काम नसल्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे,, शेतकरी चिंतेत आहे, प्रचंड दुष्काळ पडला आहे,महिला ना काम नाही सत्ताधारी फक्त राजकारण करीत आहे त्यांना जनतेचं कसलेही देणंघेणं नाही ,या ठिकाणी राजकीय इच्छाशक्ती चा अभाव आहे, त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे अशी विनंती महाराष्ट्र सैनिक सागर बडवे यांनी केली,
यावेळी सत्कारमूर्ती यांनी मनसे गौरव केल्याबद्दल राज ठाकरे यांना धन्यवाद दिले,, यावेळी दिनेश जगताप, अभिजीत आटकळे, दिपेश जगताप, प्रथमेश धुमाळ, विजय राजहंस व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते ..
