अकलूजमधील मेडिस्कॅन डायग्नोस्टीक सेंटरवरती कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडची मागणी
प्रतिनिधी–सोलापूर–सोलापूर जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन श्री डॉ प्रदीप ढेले यांना अकलूजमधील मेडिस्कॅन डायग्नोस्टिक सेंटर वरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अकलूजमध्ये अस्तिवात असलेले मेडिस्कॅन डायग्नोस्टीक सेंटर मध्ये महाराष्ट्र शासनाने 24 सप्टेंबर 2020 रोजी HRCT-Chest तपासणीसाठी 16 स्लाईसच्या मशीनसाठी 2000 रुपये,16-64 स्लाईसच्या मशीनसाठी 2500 रुपये,64 स्लाईसच्या मशीनसाठी 3000 रुपये घेण्यासाठी परिपत्रक काढले असताना अकलूजमध्ये असलेल्या मेडिस्कॅन डायग्नो स्टीक सेंटरमध्ये प्रत्येक रुग्णाकडून HRCT च्या तपासणीसाठी 5000 हजार रुपये घेतले जात असून या सेंटरमध्ये 64 स्लाईस चे मशीन असून त्यांनी शासनाच्या नियमानुसार प्रत्येक रुग्णाकडून 3000 हजार रुपये घेणे बंधनकारक असताना ज्यादा पैसे आकारून शासनाच्या कायद्याची पायमल्ली केली आहे, तसेच 24 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला शासनाचे परिपत्रक दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आले आहे अशी माहिती संबंधित सेंटर चालक डॉ प्रवीण मिसाळ हे संबंधित रुग्णाच्या नातेवाईक यांनी चौकशी केली असता देत आहेत,असे निवेदनात म्हटले आहे.
जर हे परिपत्रक रद्द केले असेल तर नवीन कोणत्या सूचना केल्या आहेत याचीही चौकशी करावी तसेच त्यांना 5000 हजार रुपये चार्ज कोणी ठरवून दिला आहे याचीही चौकशी करावी तसेच अकलूजमध्ये असलेल्या इतर सेंटरमध्ये संबंधित सेंटर पेक्षा कमी पैसे घेतले जातात मग यांना इतरांपेक्षा जास्त पैसे घेण्याचा अधिकार कुणी दिला आहे याचीही चौकशी करावी आणि तसेच शासनाने ठरवून दिलेल्या दराचे फलक सेंटरच्या दर्शनी बाजूस लावण्यासाठी आदेश असताना त्यांनी तो सेंटरमध्ये कुठेच लावलेला नाही म्हणून या मेडिस्कॅन डायग्नोस्टीक सेंटर चालकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांनी 24 सप्टेंबर 2020 नंतर तापसलेल्या प्रत्येक रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईक यांना बोलावून संबंधित सेंटरमध्ये HRCT च्या तपासणीसाठी किती रक्कम दिली आणि पावती किती रकमेची दिली आहे याची चौकशी करण्यात यावी आणि तात्काळ यांच्या सेंटरची मान्यता कायमची रद्द करण्याचा प्रस्ताव आपण सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा अन्यथा येत्या 28 डिसेंबर रोजी सिव्हिल सर्जन यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.
चौकट-
मेडिस्कॅन डायग्नोस्टीक सेंटरचे रेडिओलॉजिस्ट डॉ प्रवीण मिसाळ यांनी तोंडी सांगितले की,24 सप्टेंबर रोजीचा आदेश रद्द झालाय मात्र त्यांच्याकडे 24 सप्टेंबरच्या निर्णयाला स्थगिती किंवा रद्द केल्याचा पुरावा किंवा त्या आदेशाची माहिती उपलब्ध नाही म्हणजे डॉ मिसाळ यांनी अनेक माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रिया खोट्या असून या प्रतिक्रियेच्या माध्यमातून त्यांनी शासनाच्या निर्णयाचा खोटा प्रचार केल्याने आणि खोटी माहिती देऊन त्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरविल्याने आणि शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता मनमानी पद्धतीने सर्वसामान्य जनतेकडून शासनाच्या निर्णयानुसार HRCT च्या तपासणीसाठी 64 स्लाईस साठी 3 हजार रुपये घेणे बंधनकारक असताना त्यांनी 5 हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच त्यांनी 24 सप्टेंबर पासून तापसलेल्या प्रत्येक रुग्णांना बोलवून चौकशी करून डॉ प्रवीण मिसाळ यांनी HRCT च्या तपासणीसाठी किती रुपये घेतले याची चौकशी करावी आणि त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरुपाची कारवाई करून त्यांचा परवाना कायमचा रद्द करावा तसेच माळशिरस तालुक्यातील कोणत्याही जनतेला HRCT तपासणीसाठी ज्यादा पैसे आकारल्यास माझ्याशी संपर्क साधावा त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल
किरण साठे
अध्यक्ष–बहुजन ब्रिगेड
सरचिटणीस–सोलापूर जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
चौकट
मला आमच्या संघटनेने सांगितले की HRCT तपासणीसाठीच्या बाबतीत दर ठरविण्यात आलेल्या 24 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयाला नागपूर खंडपीठाच्या न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे,त्यामुळे मी त्या शासनाच्या निर्णयानुसार पैसे घेतले नाहीत,आणि न्यालायने संबंधित शासन निर्णयाला स्थगिती दिल्याचे परिपत्रक माझ्याकडे उपलब्ध नाही,आणि मी खाजगी दवाखान्यातून आलेल्या प्रत्येक रुग्णाकडून 5000 रुपये घेतो.
डॉ.प्रविण मिसाळ
रेडिओलॉजिस्ट मेडिस्कॅन डायग्नोस्टीक सेंटर अकलूज
