RPI गवई गटाच्या पदाधिकारी यांचा बहुजन ब्रिगेड संघटनेमध्ये प्रवेश
नातेपुते–प्रतिनिधी—बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत व प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या सूचनेनुसार आर पी आय गवई गटाचे माळशिरस तालुका संघटक अनिल साळवे तसेच माळशिरस तालुका युवक उपाध्यक्ष धीरज साळवे यांनी बहुजन ब्रिगेडचे नेते शंकर वाघमारे व पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अमित सोरटे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र सदस्य ऋषीपाल बनसोडे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार,युवा अकलूजर शहर अध्यक्ष उदय कांबळे,राहुल धाइंजे,रफिक मुलाणी संतोष जाधव,सौरभ जाधव इत्यादी उपस्थित होते.
धीरज साळवे,अनिल साळवे यांनी आर पी आय गवई गटामध्ये काम केले असून संघटनेच्या कामाने प्रभावित होऊन प्रवेश करीत असून संघटनेची ध्येय धोरणे,बहुजन समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करून संघटना वाढीसाठी मनापासून काम करणार असल्याचे धीरज साळवे व अनिल साळवे यांनी सांगितले.
