आमदार संजय जगताप यांच्याकडे कंत्राटी परिचारिकांना सेवेत सामावून घेण्यासाठी आवाज उठविण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी
प्रतिनिधी—पुरंदर—कोरोना महासंकट काळात कोविड सेंटरला कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या परीचारिकाना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी येत्या अधिवेशनात लक्षवेधी मांडून त्यांना न्याय देण्याची पुरंदर हवेली मतदारसंघात संघाचे आमदार संजय जगताप यांच्याकडे बहुजन ब्रिगेड संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ आगलावे,पुणे शहराध्यक्ष गणेश मिसाळ उपस्थित होते.
कोरोनाच्या महासंकट काळात कोविड सेंटरमध्ये कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या परिचारिकांना आरोग्य विभागात शासकीय सेवेत समावून घ्यावे आरोग्य विभागात नवीन भरती करण्यापूर्वी प्रथमता जिवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारिकांचा विचार करावा राज्यात गेल्या सहा महिन्यापासून कोरोना विषाणू महामारी चे संकट चालू आहे रोज अनेक कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत रुग्णासाठी शासनाने कोविड सेंटर चालू केली आहेत या कोविड सेंटरमध्ये संकट काळात आरोग्य परिचारिका मोठ्या धाडसाने कोविड सेंटरमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करीत आहेत आपल्या लहान लहान मुलांना घरी ठेवून स्वतःच्या व मुलांच्या जिवाचा विचार न करता परिचारिका काम करीत आहेत या आरोग्य सेविकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांनी दिलेल्या प्रमाणिक सेवेचे महत्त्व विचारात घेऊन संकटसमयी सेवा देणाऱ्या व कोरोना काळात आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या परिचारिकांना ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे त्यांना आरोग्य सेवेत सामावून घेण्यात येऊन आरोग्य परिचारिकांना न्याय मिळवून द्यावा असे दत्ता कर्चे यांनी निवेदनात म्हटले आहे.
Covid-19 या महाभयंकर साथ रोगाचा मुकाबला करणाऱ्या परिचारकांना कामावरून कमी केले तर खूप मोठा त्यांच्यावर अन्याय होईल समाजाच्या प्राणांची रक्षण करणाऱ्या परिचारिका कोरोना युद्धांना कोरोनाची साथ संपल्यावर कामावरून काढणे म्हणजे कोरोना युद्धांना बेरोजगार करणे त्यांच्यावर असा अन्याय न करता त्यांना आरोग्य सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांना सेवेत समावून घेतल्यानंतरच शासनाने आरोग्याच्या नवीन भरती चा विचार करावा आरोग्याची नवीन भरती करण्यापूर्वी कोविड सेंटर मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विचार करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवून त्यांना कामावर रुजू करून घेण्यासाठी लक्षवेधी मांडून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे केली आहे.
