माळशिरस नगरपंचायत चे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांनी 60 लाखांची निविदा अवैधरित्या मंजूर केल्याप्रकरणी नगराध्यक्षांनी घेतली जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव

माळशिरस नगरपंचायत चे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांनी 60 लाखांची निविदा अवैधरित्या मंजूर केल्याप्रकरणी नगराध्यक्षांनी घेतली जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव

मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांनी नगराध्यक्षांना विचारात न घेता ठेकेदाराची टाळू भरल्याची चर्चा

प्रतिनिधी—सचिन रणदिवे–माळशिरस–माळशिरस नगरपंचायत चे विद्यमान मुख्याधिकारी यांनी माळशिरस नगरपंचायतीच्या किंवा स्थायी समितीच्या मान्यतेशिवाय बेकायदेशीरपणे रक्कम रुपये 60 लाखांची निविदा मंजूर करून अवैधरित्या करार केल्याचा प्रकार समोर आला आहे म्हणून नगराध्यक्ष सौ द्रोपदी बाजीराव देशमुख व इतर नगरसेवक यांनी जिल्हाधिकारी कडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे सदर तक्रारी अर्जामध्ये नमूद करण्यात आले की नगराध्यक्ष व इतर आठ सदस्य यांनी सदर अर्ज मान्यता म्हणून अर्जावर सह्या केलेले आहेत त्यामध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत जाधव वस्ती ते येळीव मायनर रस्ता प्रस्तवित 60 लाखांचे खडीकरणाचे काम मंजुरीचा ठराव दिनांक 02/01/2018 रोजी ठराव क्रमांक 203 प्रमाणे मंजूर केला या कामात शासनाकडून कोणतेही आदेश किंवा निर्देश देण्यात आलेले नसतानादेखील नगरपंचायत चे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांनी वादग्रस्त पद्धतीने मंजूर केले आहे प्रकार समोर आला आहे मुख्याधिकारी डॉ विश्वनाथ वडजे यांनी ठेकेदाराची टाळू भरल्याची चर्चा माळशरस शहरांमध्ये जोर धरत आहे या प्रकरणासंदर्भात निविदेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच सदर प्रकरणाची कागदपत्र मुख्याधिकारी यांच्याकडून तात्काळ मागवण्यात यावीत व इतर योग्य ते न्याय आदेश व्हावेत असे सदर अर्ज मध्ये नमूद करण्यात आले आहे या अर्जावरती डॉ मारुती शिवाजीराव पाटील,आप्पासाहेब एकनाथ देशमुख,नवनाथ रामहरी वाघमोडे,सौ मनीषा सुनील इंगळे,सौ मधुमती हनुमंत सोनवणे,सौ शोभा आबा धाईंजे,श्रीमती लक्ष्मी भीमराव सावंत,सौ रंजना गंगाधर पिसे,
सौ लतादेवी धुळदेव सिद यांनी या आर्जास मान्यता व स्वीकृती दिली आहे या प्रकरणांमध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब हे माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांच्यावर काय कारवाई करतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom