नातेपुते येथे बहुजन ब्रिगेडच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
प्रतिनिधी—नातेपुते—बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बहुजन ब्रिगेडचे नेते शंकर वाघमारे,बहुजन युवक ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमित सोरटे,जाधववाडी चे प्रगतशील शेतकरी रामचंद्र जानकर,दलित महासंघाचे केरबा लांडगे,पिंपरीचे माजी सरपंच दादासाहेब बजबळकर,जेष्ठ नेते आप्पा वाघापुरे,जिल्हा सचिव माऊली धाइंजे,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता सावंत,युवक जिल्हा उपाध्यक्ष नारायण पवार तालुका कार्याध्यक्ष विकास बनसोडे महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुक्मिणी रणदिवे,मांडवे विभाग प्रमुख बबलू कर्चे,नातेपुते विभाग प्रमुख सतीश बजबळकर,लखन ओव्हाळ,विजय काळेल,अमित बजबळकर,विठ्ठल कर्चे,अजित खुडे,धनाजी कर्चे,राहुल सोरटे,गणेश घोडके,रविराज सोरटे,रफिक सय्यद,पिंटू एकतपुरे,सुदाम आवारे,तसेच बहुजन ब्रिगेडचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी उपयोग करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,त्याचप्रमाणे संघटनेकडून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


