छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पद्मावती बाग रोड येथील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करा–सागर बडवे
प्रतिनिधी —पंढरपूर—छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पद्मावती बाग येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे या रस्त्याचे काम झाले आहे सदरील या रस्त्याच्या कामाबाबत अनियमितता व निष्काळजीपणा झालेला दिसून येत आहे सदर पूर्ण असलेले रस्त्याचे काम खराब पद्धतीने झाले असल्याचे दिसून येत आहे रस्ता पडलेला दिसून येत आहे त्यामुळे रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मनविसे च्या वतीने करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक या रोडवरील खड्ड्याच्या भोवती रांगोळी काढून एक वर्षाखाली आंदोलन केले होते त्यामुळे पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर ने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पद्मावती बाग पर्यंत डांबरीकरण केलेले होते त्यामुळे एकच वर्षात त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दिनांक 8 12 2020 रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी यावेळी असे सागर बडवे महाराष्ट्र सैनिक यांनी सांगितले यावेळी मनविसे शहर संघटक शैलेश धट मनविसे शहर उपाध्यक्ष अवधूत गडकरी मनविसे शहर उपाध्यक्ष रोहन पंढरपूरकर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
