धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पोस्टमधून बाळ दादांचा फोटो गायब

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पोस्टमधून बाळ दादांचा फोटो गायब

प्रतिनिधी—सोलापूर—सद्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात अली असताना भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज एक फेसबुक पोस्ट शेर केली असून त्या पोस्टमध्ये फक्त सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याच प्रतिमा दिसत आहेत,आणि त्या पोस्टमध्ये मोहिते पाटील ब्रँड असे लिहिले असल्याने अनेक तर्क लावले जात असून या माळशिरस तालुक्याची पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे समजते.

मात्र या निवडणुकीत ज्यांचे मतदान आहे ते पदवीधर व शिक्षक हे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळ दादा त्यांच्या ताब्यात आहेत.मात्र त्यांचा कुठेही सहभाग दिसला नाही किंवा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सभापती त्यांचे सुपुत्र संग्रामसिंह मोहिते पाटील यांचाही सहभाग दिसला नाही व त्यांच्या कन्या
जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वरूपाराणी मोहिते पाटील ही या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत असल्याचे दिसले नाही बाळ दादा हे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असल्याने त्यांचा शब्द हा अखेरचा ठरणार आहे,मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या पोस्टमधून बाळ दादांचा फोटो वगळून पोस्ट टाकल्याने तालुक्यातील पदवीधर व शिक्षक यांच्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे,तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा अनेक तर्क लढविले जाऊ लागलेत त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला धोबीपछाड मिळाल्यास नवल वाटायला नको.
आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या फेसबुक पोस्ट मधून बाळ दादांचा फोटो का गायब आहे या चर्चेनेही जोर धरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom