८०वर्षांच्या योद्धाला वाढदिवसाची भेट देण्याची हीच वेळ–किरण साठे
प्रतिनिधी—महविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर हे उमेदवार असून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन महविकास आघाडीचे जनक व 80 वर्षाचा योद्धा म्हणून ज्यांना महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये ओळखले जाते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भेट देण्याची हीच वेळ असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे,काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात,तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार,यांचे हात बळकट करण्यासाठी महविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन किरण साठे यांनी केले आहे.
गेल्या दोन टर्म पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे,मात्र त्यांनी या पदवीधर मतदारांनासाठी कोणती कामे केली आहेत,कोणत्याही पदवीधर मतदाराला माहीत नाहीत,त्याप्रमाणे 2014 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचेच सरकार असताना व स्वतः ते मंत्री असताना कोणतीच कामे केली नाही त्यामुळे आपले हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार बंधू व भगिनींनी महविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन किरण साठे यांनी केले.
