गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी २ डिसेंबर रोजी सोलापूर येथे आंदोलन
प्रतिनिधी—माळशिरस—माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ग्रामपंचायतीने एलईडी बल व साहित्य खरेदी करण्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने त्याची चौकशी केलेला अहवाल घेवून व तसेच राहिलेल्या चौकश्या त्वरित करून संबंधित ठेकेदार,ग्रामसेवक,सरपंच यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्या भ्रष्टाचार प्रकरणातील ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकून,संबंधित ग्रामपंचायत सरपंचाचे सरपंच पद त्वरित रद्द करण्यात यावे,तसेच या प्रकरणातील धर्मपुरी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांना त्वरित निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी कोळी महासंघ संघटनेच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र आपण आमच्या निवेदनाची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ आज माळशिरस यांनी पंचायत समिती या कार्यालयासमोर कोळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक सागर कोळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी आशु ढवळे,गणेश जगताप,जगन्नाथ धेंढे,पिंटू एकतपुरे,नारायण शिंदे इत्यादी उपस्थित होते.
सदर आंदोलनाला धर्मपुरी ग्रामपंचायत चे माजी सरपंच नितीन निगडे,ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील,प्रदीप झेंडे,शहाजी मदने,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अभिजित गायकवाड,काँग्रेसचे बाळासाहेब मगर,श्रीमंत मगर,यांनी पाठिंबा दिला.
चौकट
गटविकास अधिकारी या नात्याने याची दखल घेऊन पाटील मॅडमनी कारवाई केली नाही म्हणून गटविकास अधिकारी यांच्या निषेधार्थ आज माळशिरस पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.या प्रकरणामध्ये गटविकास अधिकारी हे सरपंच,ठेकेदार,व ग्रामसेवक यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत,त्यामुळे माळशिरस गटविकास अधिकारी यांच्यवरती कारवाई करावी या मागणीसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर दिनांक २ डिसेंबर रोजी आंदोलन करणार आहे.
सागर कोळी
पश्चिम महाराष्ट्र संघटक
कोळी महासंघ