राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवीन सरकार स्थापन झाल्याचा अकलूजमध्ये मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करून आनंद साजरा
अकलूज–महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून या सरकारमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी मुख्यमंत्री पदाची व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,छगन भुजबळ यांनी, व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,नितीन राऊत यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्याने अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला,त्याच प्रमाणे अकलूजमध्ये रामायण चौक,काझी गल्ली येथे फटाक्या, तोफांची आतिषबाजी करून,मोठया प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात आला.यावेळी अनेक अकलूजकर यामध्ये सहभागी झाले होते.